पुणेकरांसाठी खुशखबर! अवघ्या दहा रुपयांत‘वातानुकुलित’प्रवासाची संधी; महापालिकेची 'पुण्यदशम' बसप्रवास योजना

By ऑनलाइन लोकमत | Published: July 6, 2021 09:02 PM2021-07-06T21:02:12+5:302021-07-06T21:06:28+5:30

स्वस्त, गतिमान, आरामदायी, वेळेची बचत करणारा, सुरक्षित प्रवास ही या 'पुण्यदशम' बस प्रवास योजनेची खास वैशिष्ट्ये...

Opportunity for ‘air-conditioned’ travel for Pune citizens just in10 rupees; 'Punyadasham' bus travel scheme will be launched | पुणेकरांसाठी खुशखबर! अवघ्या दहा रुपयांत‘वातानुकुलित’प्रवासाची संधी; महापालिकेची 'पुण्यदशम' बसप्रवास योजना

पुणेकरांसाठी खुशखबर! अवघ्या दहा रुपयांत‘वातानुकुलित’प्रवासाची संधी; महापालिकेची 'पुण्यदशम' बसप्रवास योजना

googlenewsNext

पुणे : महापालिकेच्यावतीने अवघ्या दहा रुपयात दिवसभरासाठी वातानुकुलीत बस प्रवास योजना आणण्यात आली आहे. या योजनेला ‘पुण्यदशम’ असे नाव देण्यात आले आहे. पहिल्या टप्प्यात २ जुलैपासून आकर्षक गुलाबी रंगसंगतीच्या ५० मीडी बसेस पुण्यातील मध्यवर्ती भाग आणि पेठांमध्ये प्रवासासाठी देण्यात येणार आहेत. त्यानंतर डिसेंबरमध्ये ३०० आणखी बस उपलब्ध केल्या जाणार आहेत. संपूर्ण शहरात सहा विभागांमध्ये या योजनेचा विस्तार करण्यात येणार असल्याची माहिती स्थायी समितीचे अध्यक्ष हेमंत रासने यांनी दिली.

महापालिकेच्या सन २०२०-२१ च्या अर्थसंकल्पामध्ये ही योजना मांडण्यात आली होती. या योजनेला नुकतीच मंजुरी मिळाली आहे. या योजनेंतर्गत दिवसभरामध्ये दहा रुपयात वातानुकुलीत बसमधून कितीही वेळा  प्रवास करता येणार आहे. सीएनजीवर चालणा-या या मिडी बसची आसन क्षमता 24 आहे. छोटी बस असल्याने मध्यवस्तीतील लहान रस्त्यांवरुनही ही बस धावू शकणार आहे.
====
स्वस्त, गतिमान, आरामदायी, वेळेची बचत करणारा, सुरक्षित प्रवास ही या योजनेची खास वैशिष्ट्ये आहेत. वाहतुकीची कोंडी पार्किंगची समस्या, प्रदूषण, आरोग्याच्या तक्रारी कमी होण्यास मदत होणार आहे. प्रवाशाचा वेळ, पैसा, इंधन याची मोठ्या प्रमाणात बचत होऊ शकेल. पुण्यदशमच्या माध्यमातून खासगी वाहनांकडून सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेकडे वळण्याचा पर्याय देण्याचा प्रयत्न आहे.
- हेमंत रासने, अध्यक्ष, स्थायी समिती
====

पहिल्या टप्प्यातील समाविष्ट भाग
डेक्कन ते पूलगेट, स्वारगेट से पुणे स्टेशन, स्वारगेट ते शिवाजीनगर या मार्गाच्या दरम्यान येणा-या सर्व पेठा आणि मध्यवर्ती भाग
===

देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत पाटलांच्या हस्ते होणार उद्घाटन 

विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते शनिवारी (ता. 9 जुलै) दुपारी १ वाजता आर्यन पार्किंग, महात्मा फुले मंडई येथे होणार आहे.
===

Web Title: Opportunity for ‘air-conditioned’ travel for Pune citizens just in10 rupees; 'Punyadasham' bus travel scheme will be launched

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.