पुरंदरमध्ये पक्षवाढीस भाजपला संधी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2021 04:08 AM2021-07-23T04:08:26+5:302021-07-23T04:08:26+5:30
जेजुरी : पुरंदर तालुक्यात पक्षावाढीसाठी भाजपला मोठी संधी असून कार्यकर्त्यांनी कामाला लागावे, असे आवाहन प्रदेश भाजपच्या उपाध्यक्षा चित्रा वाघ ...
जेजुरी : पुरंदर तालुक्यात पक्षावाढीसाठी भाजपला मोठी संधी असून कार्यकर्त्यांनी कामाला लागावे, असे आवाहन प्रदेश भाजपच्या उपाध्यक्षा चित्रा वाघ यांनी केले.
पुणे जिल्हा भाजपचे उपाध्यक्ष राहुल शेवाळे यांच्या माध्यमातून पुरंदर हवेली मतदारसंघात नागरिकांची मोफत आरोग्य तपासणी, औषधोपचार तसेच आजाराविषयी मार्गदर्शन करण्यासाठी अटल आरोग्य रथ हा उपक्रम राबविण्यात येत आहे. या रथाचे जेजुरीत आगमन झाले. त्यावेळी मोफत आरोग्य तपासणी शिबिराचा शुभारंभ भाजपच्या प्रदेश उपाध्यक्षा चित्रा वाघ यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी पुणे जिल्हा भाजपच्या महिला अध्यक्षा कांचन कुल, जिल्हा उपाध्यक्ष राहुल शेवाळे, वैद्यकीय आघाडीच्या डॉ. तेजस्विनी अरविंद, सरचिटणीस श्रीकांत थिटे, प्रदेश ओबीसी मोर्चाचे उपाध्यक्ष सचिन लंबाते, शहर भाजपचे अध्यक्ष सचिन पेशवे, शहर कार्यध्यक्ष गणेश भोसले, कैलास जगताप, मैना जाधव, वैशाली पवार, अलका शिंदे उपस्थित होते.
चित्रा वाघ म्हणाल्या, पुरंदर मतदार संघात भाजपाच्या कार्यकर्त्यांनी एकजुटीने पक्ष वाढीसाठी प्रयत्न करावा, आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती वा इतर निवडणुकांसाठी आजपासून तयारी सुरू करा, अटल आरोग्य रथ हा उपक्रम अत्यंत स्तुत्य असून तो सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवला पाहिजे.
यावेळी जिल्हाध्यक्षा कांचन कुल राहुल शेवाळे यांची ही भाषणे झाली.
तीन दिवस हा आरोग्य रथ जेजुरीत थांबून सर्वसामान्यांना आरोग्य सुविधा मोफत पुरवणार आहे
कार्यक्रमाचे नियोजन जेजुरी शहर भाजपचे अध्यक्ष सचिन पेशवे, गणेश भोसले, प्रसाद अत्रे, तुकाराम यादव आदींनी केले.
२२ जेजुरी