कोवीडमुळे अवसरी २५ डिसेंबर पर्यंत बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 23, 2020 04:09 AM2020-12-23T04:09:10+5:302020-12-23T04:09:10+5:30

अवसरी : आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागात पंधरा दिवसात मोठ्या प्रमाणात कोविडचे रुग्ण वाढत चालले असून अवसरी खुर्द गावात ३६ ...

Opportunity closed till 25th December due to Kovid | कोवीडमुळे अवसरी २५ डिसेंबर पर्यंत बंद

कोवीडमुळे अवसरी २५ डिसेंबर पर्यंत बंद

Next

अवसरी : आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागात पंधरा दिवसात मोठ्या प्रमाणात कोविडचे रुग्ण वाढत चालले असून अवसरी खुर्द गावात ३६ कोविड रुग्ण उपचार घेत आहेत. ग्रामपंचायतीने खबरदारीचा उपाय म्हणून अवसरी खुर्द गाव मंगळवार दि. २२ ते दि. २५ डिसेंबर पर्यंत बंद ठेवण्यात आले आहे. बंद काळात गावात येवू नये असे आवाहन ग्रामविकास अधिकारी आर.टी.गाढवे यांनी केले आहे.

अवसरी खुर्द येथील ग्रामदैवत श्री काळ भैरवनाथ यात्रा उस्तवा निमित्त गावात कोरोंनाचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून ठराविकच कार्यक्रम आयोजित केले होते. त्यामुळे सप्ताह काळात किर्तनाच्या ऐवजी दररोज स्थानिक भजनकरी मंडळी यांनीच भजनाचा कार्यक्रम केला व देवजन्माचे दिवशी फक्त एक तासाचे किर्तन झाले. मात्र दुसर्‍या दिवशी देवदर्शनासाठी ग्रामस्थांची ये-जा वाढल्याने अवसरी खुर्द गावात ४० कोविड रुग्ण सापडल्याने गावातील आठवडे बाजार व गाव बंद ठेवण्याची मागणी ग्रामस्थ करत होते. मागणीचा विचार करून व गावात कोविडचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून ग्रामपंचायतीने खबरदारीचा उपाय म्हणून अवसरी खुर्द गाव मंगळवार दि. २२ ते दि.२५ डिसेंबर पर्यंत गावातील दवाखाना, मेडिकल, दूध व्यवसाय सोडून ईतर सर्व व्यवहार बंद ठेवण्यात आले आहेत अशी माहिती ग्रामविकास अधिकारी आर.टी.गाढवे यांनी दिली.

--

चौकट

आठवडे बाजारही बंद

तालुक्याच्या पूर्व भागात भागात सुद्धा अवसरी बुद्रुक, गावडेवाडी, मेंगडेवाडी, निरगुडसर, जारकरवाडी, लखणगाव, देवगाव आदी गावातही कोविड रुग्णांची संख्या वाढत चालली असून प्रशासनाने कडक उपाय करावेत अशी मागणी ग्रामस्थ करत आहेत. तसेच गावात गर्दी टाळण्यासाठी भरणारे आठवडे बाजार तात्पुरते बंद ठेवावे व मंगल कार्यालयात होणारी गर्दी कमी करावी, वराती बंद कराव्यात अशी मागणी ग्रामस्थ करत आहेत. या बाबत मंचर पोलिसांनी व प्रशासनाने कडक उपाय योजना करावी अशी सुद्धा मागणी होत आहे.या बाबत राज्याचे कामगार व राज्य उत्पादन शुल्क मंत्री मा.ना.श्री. दिलीपराव वळसे पाटील यांनी मंचर पोलिस स्टेशन व आंबेगाव तालुक्यातील प्रशासकीय अधिकारी यांना योग्य ते आदेश द्यावेत अशी मागणी ग्रामस्थ करत आहेत.

--

फोटो - २२अवसरी गाव बंद

छायाचित्र मजकूर:

अवसरी खुर्द गावात कोविड रुग्ण संख्या वाढत असल्याने गाव मंगळवार दि. २२ ते दि.२५ डिसेंबर पर्यंत बंद ठेवण्यात आले आहे.

Attachments area

Web Title: Opportunity closed till 25th December due to Kovid

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.