संरक्षण संशोधनाची संधी ५०० विद्यार्थ्यांना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2021 04:15 AM2021-08-28T04:15:46+5:302021-08-28T04:15:46+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : डिफेन्स अँड टेक्नॉलॉजीमध्ये मोठ्या प्रमाणात संशोधन सुरू आहे. देशभरातील वेगवेगळ्या भागात ५०० जणांकडून यावर ...

Opportunity for defense research for 500 students | संरक्षण संशोधनाची संधी ५०० विद्यार्थ्यांना

संरक्षण संशोधनाची संधी ५०० विद्यार्थ्यांना

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : डिफेन्स अँड टेक्नॉलॉजीमध्ये मोठ्या प्रमाणात संशोधन सुरू आहे. देशभरातील वेगवेगळ्या भागात ५०० जणांकडून यावर संशोधन करण्यात येत आहे, असे संरक्षण विभागातील रिसर्च अँड डेव्हलपमेंट विभागाचे सचिव व संरक्षण संशोधन विकास संस्थेचे (डीआरडीओ) अध्यक्ष डॉ. जी. सतीश रेड्डी यांनी सांगितले.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा ‘संरक्षण व सामरिकशास्त्र विभाग आणि इन्स्टिट्यूट ऑफ डिफेन्स सायंटिस्ट अँड टेक्नॉलॉजिस्ट’ (आयडीएसटी), पुणे शाखा यांच्यात २७ एप्रिल रोजी सामंजस्य करार करण्यात आला. या करारानुसार विद्यापीठात ‘डिफेन्स अँड टेक्नॉलॉजी’ विषयात पीजी डिप्लोमा सुरू केला आहे.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. एन. एस. उमराणी, कुलसचिव डॉ. प्रफुल्ल पवार, संरक्षण व सामरिकशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. विजय खरे, संरक्षण प्रगत तंत्रज्ञान संस्थेचे कुलगुरू डॉ. सी. पी. रामनारायण, आयडीएसटीचे अध्यक्ष डॉ. सी. एल. धामेजनी उपस्थित होते.

डॉ. रेड्डी म्हणाले, संशोधनासाठी संरक्षण मंत्रालयाकडून संरक्षण विषयातील शिक्षणावर भर दिला जात आहे. यातून कौशल्य असणारे मनुष्यबळ निर्माण करण्यात येणार आहे. सध्या दोन हजारांहून अधिक उद्योग या कामात आहेत.

----

अभ्यासक्रमाची वैशिष्ट्ये

पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन डिफेन्स टेक्नॉलॉजी

कालावधी- एक वर्ष

पात्रता- अभियांत्रिकी किंवा विज्ञान विषयातील पदवीधर

सेमिस्टर - दोन

श्रेयांक- ३२

अधिक माहिती- www.unipune.ac.in

Web Title: Opportunity for defense research for 500 students

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.