स्मार्ट सिटीत घरकुलाचे स्वप्न साकारण्याची संधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2021 04:10 AM2021-07-17T04:10:27+5:302021-07-17T04:10:27+5:30

पिंपरी-चिंचवड शहरामध्ये उपनगरांमध्ये मोठ्या प्रमाणावर अत्याधुनिक आणि अ‍ॅमिनिटी असणारे प्रकल्प साकारले जात आहेत. मोशी, चऱ्होली, डुडुळगाव, दिघी, चिखली या ...

Opportunity to dream of a home in a smart city | स्मार्ट सिटीत घरकुलाचे स्वप्न साकारण्याची संधी

स्मार्ट सिटीत घरकुलाचे स्वप्न साकारण्याची संधी

Next

पिंपरी-चिंचवड शहरामध्ये उपनगरांमध्ये मोठ्या प्रमाणावर अत्याधुनिक आणि अ‍ॅमिनिटी असणारे प्रकल्प साकारले जात आहेत. मोशी, चऱ्होली, डुडुळगाव, दिघी, चिखली या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणावर गृह प्रकल्प उभारले जात आहेत. नव्याने विकसित होणारा परिसर आहे. नागरिकांच्या घराचे स्वप्न साकार करण्याबरोबरच गुंतवणुकीसाठीही या भागातील प्रकल्पांमध्ये घरकुल उपलब्ध आहेत.

.......................

उपनगरात परवडणारी घरे

वाढते नागरीकरण पाहता पिंपरी-चिंचवड हे शहर वेगाने विकसित होणारे शहर आहे. या शहरांमध्ये कामगार मध्यमवर्गीय आणि उच्च मध्यमवर्गीय अशा विविध गटातील नागरिक वास्तव्यास आहेत. त्यामुळे त्यांना परवडेल अशी घरकुले उपलब्ध करून देण्यासाठी बांधकाम व्यावसायिकांनी प्रयत्न केले आहेत. शहराच्या विकासामध्ये बांधकाम व्यावसायिक यांचे मोठे योगदान असून, सुनियोजित शहरासाठी शहराच्या व बांधकाम व्यावसायिक यांच्या वतीने महत्त्वपूर्ण आणि महत्त्वाकांक्षी प्रकल्प उभारले जात आहेत. त्यात अधिकाधिक सुविधा देण्यासाठी देण्यास प्राधान्य दिले जात आहे. सध्या चिखली, चऱ्होली, मोशी परिसराबरोबरच रावेत, वाकड, किवळे या परिसरामध्ये गुंतवणुकीसाठी नागरिकांना मोठी संधी आहे.

........................

घरखरेदीला उत्तम संधी

रॉ मटेरियलच्या किमती वाढत आहे. लेबरच्या किमती वाढत आहे. जागेच्या किमती वाढत आहे, असे असूनसुद्धा नागरिकांना त्यांच्या बजेटमध्ये बसेल अशी मोठी टाउनशिप आम्ही उभारत आहोत. याचा नागरिकांनी फायदा घ्यावा. सध्या बँकेचे व्याजदर कमी झालेले आहेत. मोठ्या टाउनशिपमध्ये राहणे आता खूप सोयीस्कर आणि महत्त्वाचे झाले आहेत. मोठ्या टाऊनशिपची गरज आज का आहे, तर सध्याची परिस्थिती बघता एकटेपणा वाटत आहे. मोठ्या टाऊनशिपमध्ये जास्तीत जास्त सोयी सुविधा उपलब्ध असतात. तसेच लॉकडाउनच्या काळात? याची नागरिकांना एकटेपणाची खूप जाणीव झालेली दिसते. तसेच मोठ्या सोसायटीमध्ये सेफ्टी आणि सेक्युरिटीला अधिक महत्त्व दिले जाते. त्यामुळे भविष्यात आताच्या संकटापेक्षाही मोठी परिस्थिती ओढवली. तरी याचा त्रास जाणवणार नाही. कमीत कमी किमतीमध्ये उच्च दर्जांची गुणवत्ता घराच्या बाबतीत कुठेही मिळणे अशक्य आहे आणि ते विकसक मोठ्या प्रमाणावर देत आहेत. त्यामुळे घरखरेदी आणि नक्कीच ग्राहकांनी याचा विचार करावा. मध्यमवर्गाला त्यांच्या बजेटमध्ये त्यांचे स्वप्नातील घर आज पूर्ण होऊ शकते. इन्व्हेस्टमेंटचा जर विचार करत असाल तरीही याचा फायदा होऊ शकतो. कारण आजच्या तारखेला कमी किमतीत हे घर उपलब्ध होत आहे. कारण भविष्यात याची किंमत वाढणार आहेत आणि टॅक्सचे फायदा यात आहे. प्लॉटिंगमध्ये गुंतवणूक करताना डेव्हलपर्स कोण आहेत हे पडताळून घेणे महत्त्वाचे आहे.

......................

दळणवळणाची साधने

पिंपरी-चिंचवड शहराचा स्मार्ट सिटीत समावेश झाल्याने तसेच दळणवळणाची साधने मोठ्या प्रमाणावर उपलब्ध असणारे उद्योगनगरीमध्ये वास्तव्य करण्यास, राहण्यास नागरिक मोठ्या प्रमाणावर प्राधान्य देत आहे. शहराच्या लगतच चाकण तळेगाव हिंजवडी या एमआयडीसी आहेत. तसेच हिंजवडी परिसरात माहिती तंत्रज्ञाननगरी वसली आहे. त्यामुळे दळणवळणाची साधने उपलब्ध असल्याने पिंपरी-चिंचवड शहरात नागरिक राहण्यास पसंती देत आहे. दुसरी बाब म्हणजे, घरांना मोठ्या प्रमाणावर मागणी असल्याने बांधकाम व्यावसायिकांनीही घरकुल प्रकल्प उभारले गेले आहेत. तसेच मुंबई पुण्यातील नागरिक सेकंड होमलाही या परिसरात प्राधान्य देत आहेत. याचे कारण म्हणजे शहराचा पिंपरी चिंचवड शहर स्मार्ट सिटीमध्ये झालेला समावेश तसेच या शहरांमध्ये मेट्रो मार्ग नव्याने विकसित केला जात आहे, हे आहे. तसेच कासारवाडी ते पुणे नाशिक महामार्गच्या दोन्ही बाजूलाही मोठ्या प्रमाणावर गृहप्रकल्प साकारले जात आहेत. त्यामुळे या ठिकाणी घर घेण्यास मोठ्या प्रमाणावर मागणी वाढत आहे. कोरोनाचा कालखंड संपला असून, नागरिकांना स्वप्नातील घरखरेदीसाठी ही सुवर्णसंधी आहे.

- राजेश मेहता

Web Title: Opportunity to dream of a home in a smart city

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.