स्वीकृत नगरसेवकपदी डॉक्टर, इंजिनिअरला संधी
By admin | Published: March 17, 2017 02:15 AM2017-03-17T02:15:26+5:302017-03-17T02:15:26+5:30
राजकीय पक्षांकडून पराभूत झालेल्या किंवा निवडून न येऊ शकणाऱ्या कार्यकर्त्यांना मागच्या दाराने स्वीकृत नगरसेवक म्हणून पालिकेच्या सभागृहात आणण्याच्या परंपरेस
पिंपरी : राजकीय पक्षांकडून पराभूत झालेल्या किंवा निवडून न येऊ शकणाऱ्या कार्यकर्त्यांना मागच्या दाराने स्वीकृत नगरसेवक म्हणून पालिकेच्या सभागृहात आणण्याच्या परंपरेस यंदा ब्रेक लागण्याची शक्यता आहे. नवीन नियमावली व उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार पाच वर्षांचा अनुभव असणारे डॉक्टर, निवृत्त प्राध्यापक, प्राचार्य, वकील, इंजिनिअर, निवृत्त अधिकारी, स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी यांपैकीच स्वीकृत सदस्य म्हणून निवड करता येणार आहे.
महापालिकेमध्ये संख्याबळानुसार ५ स्वीकृत नगरसेवकांची निवड सभागृहामध्ये करता येणार आहे. वेगवेगळ्या क्षेत्रांतील तज्ज्ञ व्यक्तींच्या ज्ञानाचा व अनुभवाचा महापालिकेला फायदा व्हावा या हेतूने स्वीकृत नगरसेवकपदाची तरतूद करण्यात आलेली होती. मात्र राजकीय पक्षांकडून कार्यकर्त्यांचे पुनर्वसन करण्यासाठीच स्वीकृत नगरसेवकपदाचा वापर आतापर्यंत केला जात आहे. (प्रतिनिधी)