व्यसनी कर्मचाऱ्यांना पालिकेकडून सुधारण्याची संधी; उपचार घेण्यासाठी मिळणार पगारी रजा

By ऑनलाइन लोकमत | Published: January 11, 2021 10:07 PM2021-01-11T22:07:56+5:302021-01-11T22:09:16+5:30

नुकत्याच पालिकेच्या एका कर्मचाऱ्याने अशाच एका व्यसनमुक्ती केंद्रामध्ये दहा दिवस राहून उपचार घेतले.

Opportunity to improve addicted employees by the municipality; Paid leave for treatment | व्यसनी कर्मचाऱ्यांना पालिकेकडून सुधारण्याची संधी; उपचार घेण्यासाठी मिळणार पगारी रजा

व्यसनी कर्मचाऱ्यांना पालिकेकडून सुधारण्याची संधी; उपचार घेण्यासाठी मिळणार पगारी रजा

Next
ठळक मुद्देरुबल अगरवाल : व्यसनमुक्ती केंद्रात उपचार घेण्यासाठी पगारी रजा

पुणे : महापालिकेच्या व्यसनी कर्मचाऱ्यांना सुधारण्याची संधी दिली जाणार आहे. जे कर्मचारी व्यसनमुक्त होऊ इच्छितात आणि व्यसनमुक्ती केंद्रामध्ये जाऊन उपचार घेऊन इच्छितात त्यांना दहा दिवसांची पगारी रजा दिली जाणार आहे. समाजाने तिरस्कार न करता त्यांना स्विकारावे याकरिता त्यांचा सत्कारही केला जाणार असल्याची माहिती पालिकेच्या अतिरीक्त आयुक्त रुबल अगरवाल यांनी दिली.

महापालिकेच्या आस्थापनेवर जवळपास सात ते आठ हजार चतुर्थश्रेणी कर्मचारी काम करीत आहेत. त्यातही रस्ते झाडणारे, कचरा गाड्यांवर काम करणारे, इमारतींमध्ये झाडणकाम आणि स्वच्छतेची कामे करणारे, रुग्णालय आदी ठिकाणी काम करणारे कर्मचारी अनेकदा व्यसनांचे शिकार झालेले असतात. त्यांना दारु, तंबाखू, गुटखा आदींची व्यसने जडतात. त्याचा संसार आणि मुलांच्या जडणघडणीवरही विपरीत परिणाम होतो. पालिकेच्या यंत्रणेचा हिस्सा असलेल्या या कर्मचाऱ्यांपैकी अनेकजण स्वत:हून व्यसनमुक्ती केंद्रामध्ये जाऊन उपचार घेऊन बरे होऊन आलेले आहेत. त्यांच्यामध्ये बदलही घडलेले आहेत.

नुकत्याच पालिकेच्या एका कर्मचाऱ्याने अशाच एका व्यसनमुक्ती केंद्रामध्ये दहा दिवस राहून उपचार घेतले. त्याने पालिकेला दहा दिवसांचे बिल दिले. हे बिल मंजूर केल्यानंतर अतिरीक्त आयुक्त रुबल अगरवाल यांनी ज्या कर्मचाऱ्यांना सुधारण्याची इच्छा आहे त्यांना संधी द्यायला हवी अशी भूमिका घेतली. यापुढे व्यसनमुक्ती केंद्रात उपचार घेण्यासाठी गेलेल्या कर्मचाऱ्याला पगारी रजा दिली जाणार असून तेथील बिलही पालिका भरणार असल्याचे अगरवाल यांनी सांगितले. 

Web Title: Opportunity to improve addicted employees by the municipality; Paid leave for treatment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.