कर्मचाऱ्यांना पोस्टल मतदानाची संधी!

By admin | Published: February 16, 2017 02:45 AM2017-02-16T02:45:48+5:302017-02-16T02:45:48+5:30

जिल्हा परिषद, पंचायत समिती व पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिकांमधील निवडणुकांचे चित्र आता स्पष्ट झाले असून, मतपत्रिका छापून

Opportunity for postal ballot! | कर्मचाऱ्यांना पोस्टल मतदानाची संधी!

कर्मचाऱ्यांना पोस्टल मतदानाची संधी!

Next

पुणे : जिल्हा परिषद, पंचायत समिती व पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिकांमधील निवडणुकांचे चित्र आता स्पष्ट झाले असून, मतपत्रिका छापून तयार झाल्या आहेत. यामुळे निवडणूक प्रशासनाने पोस्टल मतदानाची प्रक्रिया सुरू केली आहे. शहर आणि जिल्ह्यातील निवडणूक कामांसाठी नियुक्त केलेल्या तब्बल ६५ हजार कर्मचाऱ्यांना पोस्टल मतदान करण्याची संधी देण्यात आली असल्याची माहिती जिल्हा परिषद निवडणूक समन्यवय अधिकारी विक्रांत चव्हाण यांनी दिली.
राज्य निवडणूक आयोगाने निवडणुकीच्या कामासाठी नियुक्त करण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांना आपला मतदानाचा हक्क बजाविता यावा, यासाठी पोस्टल मतदानाचा अधिकार दिला आहे. यामध्ये निवडणुकीच्या कामासाठी कर्मचाऱ्यांना नियुक्तिपत्र देतानाच पोस्टल मतदान करण्यासाठीच्या अर्जांचे वाटप करण्यात आले. या पत्रामध्ये कर्मचाऱ्यांना कोणत्या मतदारसंघात नाव आहे, याबाबत सविस्तर माहिती भरून आपल्या निवडणूक अधिकाऱ्यांकडे हा अर्ज द्यावा लागणार आहे. पुणे शहरात निवडणूककामासाठी नियुक्ती केलेल्या कर्मचाऱ्यांचे खेड तालुक्यात मतदान असल्यास संबंधित निवडणूक अधिकारी हा अर्ज खेड तालुक्यात पाठवून देईल. त्यानंतर हा अधिकारी त्या मतदारसंघातील गट-गण किंवा प्रभागातील उमेदवारांची मतदान पत्रिका पुन्हा संबंधित निवडणूक अधिकाऱ्यांकडे पाठवून देणार आहे. त्यानंतर संबंधित कर्मचाऱ्यांनी एकाद्या अधिकाऱ्यांच्यासमोर गुप्त पद्धतीने मतदान करून ही मतपत्रिका सीलबंद करून पोस्टाने अथवा थेट संबंधित मतदान अधिकाऱ्यांकडे पोहोचविण्यात येणार आहे. मतदानपत्रिका मतदारांपर्यंत पोहोचविणे व मतदान करून पुन्हा संबंधित अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी खूपच कमी कालावधी राहिला आहे. त्यामुळे ६५ हजार कर्मचाऱ्यांचे मतदान कारणी लागणार का, हे २३ फेबु्रवारीलाच स्पष्ट होणार आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Opportunity for postal ballot!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.