स्वयंसेवकांचे खटले चालविण्याची संधी - अॅड़ एस. के. जैैन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 2, 2018 02:28 AM2018-04-02T02:28:34+5:302018-04-02T02:28:34+5:30
१९७२ मध्ये वकिली व्यवसायात पर्दापण केले़ सुरुवातीच्या काळात अनेक ज्येष्ठ वकिलांच्या सहकार्यामुळे या व्यवसायात लवकर स्थिरस्थावर होता आले़ त्याच काळात काही वर्षांनी देशात आणीबाणी लागू झाली़ या आणीबाणीला विविध क्षेत्रांतून विरोधही झाला़ राष्ट्रीय स्वंयसेवक संघाचा आणीबाणीला विरोध होता़ त्यामुळे त्या काळात अनेक स्वयंसेवकांवर खटले दाखल झाले़ त्यांची कारागृहात रवानगी झाली होती़ वकिली व्यवसाय केवळ स्वत:साठी न करता समाजासाठी काही करण्याचा नेहमीच प्रयत्न केला़
१९७२ मध्ये वकिली व्यवसायात पर्दापण केले़ सुरुवातीच्या काळात अनेक ज्येष्ठ वकिलांच्या सहकार्यामुळे या व्यवसायात लवकर स्थिरस्थावर होता आले़ त्याच काळात काही वर्षांनी देशात आणीबाणी लागू झाली़ या आणीबाणीला विविध क्षेत्रांतून विरोधही झाला़ राष्ट्रीय स्वंयसेवक संघाचा आणीबाणीला विरोध होता़ त्यामुळे त्या काळात अनेक स्वयंसेवकांवर खटले दाखल झाले़ त्यांची कारागृहात रवानगी झाली होती़ वकिली व्यवसाय केवळ स्वत:साठी न करता समाजासाठी काही करण्याचा नेहमीच प्रयत्न केला़ आणीबाणीच्या काळात हजारो स्वयंसेवकांसाठी न्यायालयात खटले चालवून त्यांना न्याय मिळवून देण्याची संधी मिळाली़ तो वकिली व्यवसायातील सर्वात चांगला काळ म्हणता येईल़
वकिली व्यवसाय करताना सहकारी वकिलांबरोबर प्रेमळ वागण्याने सर्वांचे कायमच सहकार्य मिळाले़ या व्यवसायाद्वारे लोकांची सेवा केल्याचा अभिमान आहेच़ मात्र, त्याहीपेक्षा शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रात काम करताना अधिक आनंद मिळाला़ खडकी शिक्षण संस्थेचा अध्यक्ष म्हणून गेली ३७ वर्षे कार्यरत आहे़ अनेक सामाजिक संस्थांमध्ये अध्यक्ष व इतर माध्यमातून काम केले़ मात्र, शिक्षण प्रसारक मंडळी या नामांकित संस्थेत मॅनेजिंग कौन्सिलचा अध्यक्ष म्हणून एप्रिल २०१६ मध्ये माझी निवड करण्यात आली़ तो माझ्यावर शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रातील नामांकित लोकांनी विश्वास दर्शविला़ तसेच माझ्या भावाने व मुलाने सांगितले, की मी सामाजिक कार्य करीत राहावे़ कोणत्याही गोष्टींची कमतरता पडू देणार नाही व त्याप्रमाणे ते वागत असल्याने शिक्षण प्रसारक मंडळीचा कारभार सांभाळला़ ती माझ्या आयुष्यातील सर्वात मोठी नंबर एकची कामगिरी आहे, असे वाटते़
बार कौन्सिलच्या निवडणुकीमध्ये आता मोठ्या प्रमाणावर खर्च करावा लागतो़ वेगवेगळ्या शहरांमध्ये जाऊन उमेदवारांना प्रचार करावा लागतो़ त्यासाठी मोठा खर्च येतो़ वकिली व्यवसायात कोणत्याही प्रकारचे खर्च न करता १९८५ मध्ये बार कौन्सिल आॅफ महाराष्ट्र, गोवाचे सदस्य म्हणून निवड झाली़ त्यानंतर १९९१ मध्ये पुन्हा दुसऱ्यांदा निवड झाली़ या काळात अॅड़ राम जेठमलानी, जस्टिस शिरपूरकर (सुप्रीम कोर्ट), जस्टिस दिलीप भोसले, जस्टिस अशोक देसाई, जस्टिस धनुका, अॅड़ विजयराव मोहिते, अॅड़ भास्करराव आव्हाड व इतर नामांकित वकिलांबरोबर काम करण्याची संधी मिळाली, हा माझ्या वकिली व्यवसायातील उंचीचा काळ होता़
धार्मिक क्षेत्रात दादावाडी टेम्पल ट्रस्टचे ट्रस्टी व त्यानंतर गेली ३० वर्षे प्रत्यक्ष निवडणुकीच्या वादात न पडता संस्थेला उपयोग होईल, अशा लोकांची ट्रस्टी म्हणून एकमताने देविचंद जैन, अचल जैन, कैलासवासी पी़ सी़ परमार, अॅड़ महेंद्र कोठारी, अॅड़ फत्तेचंद रांका यांच्यासमवेत काम करण्याची संधी मिळाली़ पुण्यासारख्या औद्योगिक वारसा असलेल्या शहरात सेंच्युरी एन्का, सेच्युरी टेक्स्टाईल या नामांकित कंपन्यांमध्ये स्वतंत्र संचालक म्हणून काम करण्याची संधी मिळाली़ धार्मिक क्षेत्रात अनेक कामे करता आली़
जैन इंटरनॅशनल आॅर्गनायझेशनच्या अॅपेक्स बॉडीमध्ये सदस्य म्हणून काम करण्याची संधी मिळाली, ही माझ्या जीवनातील चांगली उपलब्धी आहे़
वकिली व्यवसायातील आजवरच्या अनुभवामुळे आता ज्युनिअर वकील नेहमीच सल्ला घेण्यासाठी, आमचे अनुभव ऐकण्यासाठी येत असतात़ पुणे खंडपीठाची मागणी असो अथवा अन्य काही समस्या बार असोसिएशनमधील सहकारी वकील जेव्हा मागतील तेव्हा योग्य तो सल्ला, मार्गदर्शन देण्याचे माझी तयारी असते़
शब्दांकन : विवेक भुसे