आयआयएम नागपूरचा अभ्यासक्रम पुण्यात शिकण्याची संधी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 12, 2021 04:14 AM2021-09-12T04:14:24+5:302021-09-12T04:14:24+5:30
गुरनानी म्हणाले की, पुणे शहरालगत अनेक औद्योगिक कंपन्या असून या ठिकाणी आयआयएम नागपूरचे सॅटेलाईट केंद्र सुरू होणे ही महत्त्वाची ...
गुरनानी म्हणाले की, पुणे शहरालगत अनेक औद्योगिक कंपन्या असून या ठिकाणी आयआयएम नागपूरचे सॅटेलाईट केंद्र सुरू होणे ही महत्त्वाची गोष्ट आहे. या अभ्यासक्रमाच्या माध्यमातून उद्योग क्षेतातील तज्ज्ञ आणि शिक्षण क्षेत्र यांना जोडण्यावर भर दिला जाईल. सॅटेलाईट कॅम्पसमध्ये अभ्यासक्रम सुरू करण्यासाठी पुण्यातील सुमारे १४० कंपन्यांच्या मनुष्यबळ व्यवस्थापन प्रमुखांशी चर्चा करण्यात आली आहे. त्यांच्या गरजा जाणून घेऊन त्यानुसार लघू आणि दीर्घ कालावधीचे अभ्यासक्रम सुरू केले जाणार आहेत. त्यात सर्वप्रथम नोकरदारांसाठीचा एक्झिक्युटिव्ह एमबीए अभ्यासक्रम हा सुरू केला जाईल.
आयआयएम नागपूरचे संचालक डॉ. भीमराया मेत्री म्हणाले की, आठवड्यातून दोन दिवस शिकवल्या जाणाऱ्या एक्झिक्युटिव्ह एमबीए अभ्यासक्रमासाठी ६० जागा उपलब्ध आहेत. या अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी सामायिक प्रवेश परीक्षा घेतली जाईल. येत्या नोव्हेंबर-डिसेंबर महिन्यात अभ्यासक्रम सुरू करण्याचे नियोजन आहे. या अभ्यासक्रमासह पुढील काळात आर्टिफिशियल इंटिलिजन्स, ब्लॉकचेन, सायबर सुरक्षा आदी विषयांवरील अभ्यासक्रम सुरू करण्यात येणार आहे.
सीआयआरटीचे संचालक कॅप्टन डॉ. राजेंद्र साणेर पाटील म्हणाले की, केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी २०३० पर्यंत शून्य रस्ते अपघातांचे उद्दिष्ट समोर ठेवले आहे. त्या दृष्टीने सीआयआरटीमध्ये सुरू असलेल्या अभ्यासक्रमात काही बदल करून आयआयएम नागपूरसह रस्ते व्यवस्थापनामध्ये पदव्युत्तर पदवी आणि लघू अभ्यासक्रम सुरू करण्याचे नियोजन आहे.