MHADA | दसऱ्याच्या मुहूर्तावर पिंपरी, सासवडमध्ये म्हाडाची घरे खरेदीची संधी

By ऑनलाइन लोकमत | Published: June 30, 2022 01:03 PM2022-06-30T13:03:09+5:302022-06-30T13:05:01+5:30

इच्छुकांना म्हाडाच्या घरे घेण्याची संधी...

Opportunity to buy MHADA houses in Pimpri Saswad on the occasion of Dussehra | MHADA | दसऱ्याच्या मुहूर्तावर पिंपरी, सासवडमध्ये म्हाडाची घरे खरेदीची संधी

MHADA | दसऱ्याच्या मुहूर्तावर पिंपरी, सासवडमध्ये म्हाडाची घरे खरेदीची संधी

Next

पुणे :म्हाडाच्यापुणे मंडळात येत्या वर्षभरात पिंपरीतील संत तुकाराम नगर व सासवड येथे सदनिका व दुकाने विक्रीसाठी उपलब्ध होणार असून, त्याची जाहिरात दसऱ्यापर्यंत निघणार आहे. त्यामुळे इच्छुकांना म्हाडाच्या घरे घेण्याची संधी मिळणार आहे.

म्हाडाने पिंपरीतील संत तुकाराम नगर येथील जागेवर एक मोठा प्रकल्प सुरू झाला आहे. त्यात एकूण ७३ सदनिका व ४० दुकाने बांधली जाणार आहेत. या प्रकल्पातील सदनिका व दुकाने हे मध्यम उत्पन्न गट व उच्च उत्पन्न गटातील नागरिकांना खरेदी करता येणार आहे. त्यासाठी दसरा ते दिवाळीपर्यंत जाहिरात निघणार आहे. या प्रकल्पाची रेरा नोंदणीची प्रक्रिया सध्या सुरू असून ती महिनाभरात पूर्ण होणार असल्याची माहिती म्हाडाचे कार्यकारी अभियंता अनंत खेडकर यांनी दिली.

तर सासवड येथील प्रकल्पात ४३ सदनिका व १४ दुकाने असतील. या प्रकल्पाचे काम नुकतेच सुरू झाले असून, तो पूर्ण होण्यास एक वर्षापेक्षा जास्त अवधी लागण्याची शक्यता आहे. या प्रकल्पाच्या रेरा नोंदणीचेही काम सुरू असल्याचे खेडकर यांनी सांगितले. हा प्रकल्प केवळ अल्प उत्पन्न गटासाठी असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. रेरा नोंदणीनंतरच या दोन्ही प्रकल्पांसाठी जाहिरात निघणार आहे.

संत तुकाराम नगर : ७३ सदनिका - ४० दुकाने

सासवड : ४३ सदनिका - १४ दुकाने

पंतप्रधान आवास योजनेंतर्गत खासगी जागेवर इमारत विकसित करून त्यातील ५० टक्के सदनिका म्हाडाच्या दरानुसार विक्री करण्यास केंद्र सरकारने मंजुरी दिली आहे. त्यात पुणे व पिंपरीत ३ हजार ७४७ सदनिका उपलब्ध होणार आहेत. यामुळे बांधकाम व्यावसायिकांना विविध कर सवलती व एफएसआय मिळणार आहे.

म्हाडाकडे पुणे व पिंपरी -चिंचवड महापालिका हद्दीमध्ये जागा उपलब्ध नसल्याने हा पर्याय निवडण्यात आला आहे. त्यानुसार १४ प्रस्ताव आले आहेत. या सदनिका खडकवासला, चऱ्होली, घोटावडे, धानोरी, धायरी वडगाव, गुजर निंबाळकरवाडी, वाघोली, या ठिकाणी बांधण्यात येणार आहेत. येथील प्रस्तावांना मंजुरीदेखील देण्यात आली असल्याचे खेडकर यांनी सांगितले.

स्थळ             उपलब्ध सदनिका

खडकवासला १२०

चऱ्होली             १४००

घोटावडे             ३०८

धानोरी             २३८

धायरी             ७५

गुजर निंबाळकरवाडी १४१४

वाघोली             १९२१

एकूण             ३७४७

Web Title: Opportunity to buy MHADA houses in Pimpri Saswad on the occasion of Dussehra

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.