पत्रलेखनाचे कौशल्य आजमावण्याची संधी
By admin | Published: January 14, 2017 03:33 AM2017-01-14T03:33:05+5:302017-01-14T03:33:05+5:30
भ्रमणध्वनी, व्हॉट्स अॅपमुळे पत्रलेखनाचा आपणास विसर पडला आहे. त्या पार्श्वभूमीवर पत्रलेखन स्पर्धेचे आयोजन करण्यात
हडपसर : भ्रमणध्वनी, व्हॉट्स अॅपमुळे पत्रलेखनाचा आपणास विसर पडला आहे. त्या पार्श्वभूमीवर पत्रलेखन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
तरुण पिढीसह सर्वांच्याच हातात स्मार्ट फोन आले. त्यातील विविध अॅप्सचा वापर वाढला. इतरांना संदेश पाठविण्यासाठी व्हॉट्स अॅपसारख्या अॅपच्या माध्यमाचा अधिकाधिक वापर केला जातो. अशा वेळी आपण आपल्या स्वकीयांना चार ओळीचे पत्र लिहून पाठविण्यास टाळाटाळ करतो. या पार्श्वभूमीवर भविष्यात आपण पत्र लिखाणाला वंचित होऊ नये, म्हणून हडपसर साहित्य आणि संस्कृती मंडळ व शिवसमर्थ संस्थेच्या वतीने रविवारी (दि. १५) सकाळी १० वाजता डॉ. राम मनोहर लोहिया उद्यान, मगरपट्टा चौक, हडपसर येथे पत्रलेखन ही अनोखी स्पर्धा आयोजित केली आहे. कोणतेही शुल्क नसून स्पर्धेत ५वी ते ७वी, ८वी ते १२वी, महाविद्यालयीन आणि खुला असे ४ गट करण्यात आले आहेत. प्रत्येक गटातील ३ विजेत्यांना रोख पारितोषिके व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे.(वार्ताहर)