पुणे-नाशिक हायस्पीड रेल्वेच्या मोजणीला विरोध; शेतकऱ्यांनी जमीन मोजणीचे काम पाडले बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 10, 2021 09:41 PM2021-08-10T21:41:56+5:302021-08-10T21:42:46+5:30

शेतकऱ्यांनी मोजणी करून देण्यास विरोध दर्शवल्यामुळे रेल्वे अधिकारी व इतर शासकीय अधिकाऱ्यांना फिरावे लागले माघारी

Oppose to Pune-Nashik high speed railway; Farmers stop land survey | पुणे-नाशिक हायस्पीड रेल्वेच्या मोजणीला विरोध; शेतकऱ्यांनी जमीन मोजणीचे काम पाडले बंद

पुणे-नाशिक हायस्पीड रेल्वेच्या मोजणीला विरोध; शेतकऱ्यांनी जमीन मोजणीचे काम पाडले बंद

Next

वडगाव कांदळी :-पुणे-नाशिक हायस्पीड रेल्वेच्या सर्वेक्षणाचे काम सुरू असून मंगळवारी (दि. १०) भटकळवाडी  (ता. जुन्नर )येथे जमिनीची प्रत्यक्ष मोजणी करण्यासाठी आलेल्या रेल्वे अधिकारी व इतर शासकीय अधिकाऱ्यांना शेतकऱ्यांनी जमिनीची मोजणी करून न देता माघारी पाठवले.

भूसंपादन प्रक्रियेसाठी प्रत्यक्ष जमिनीची मोजणी करण्यासाठी भटकळवाडी येथे महारेलचे उपमहाव्यवस्थापक , व्यवस्थापक, समन्वयक , मंडलाधिकारी, तलाठी  यांच्यासह कृषी विभागाचे अधिकारी हे सर्वजण शेतकऱ्यांच्या संभाव्य नुकसानीची प्रत्यक्ष पाहणी व पंचनामे करण्यासाठी भटकळवाडी या ठिकाणी आले होते. यावेळी शेतकऱ्यांनी मोजणी करून देण्यास विरोध दर्शवून त्यांना माघारी पाठविले.         

जुन्नर तालुक्यातील नारायणगाव,हिवरे तर्फे नारायणगाव,वडगाव कांदळी, नगदवाडी, भटकळवाडी, आळे, कोळवाडी,संतवाडी या गावातून पुणे-नाशिक हायस्पीड रेल्वे जात आहे. यासाठी महारेल ने मोजणीची प्रक्रिया सुरू सुरू केली आहे. परंतु, शेतकर्‍यांना जमिनीचा मोबदला किती याबाबत कोणतीही पूर्वकल्पना दिलेली नाही. अनेक शेतकऱ्यांच्या विहिरी,घरे जात असून त्यांच्यापुढे उदरनिर्वाहाचा मोठा प्रश्न उभा राहिला आहे. अनेक शेतकऱ्यांनी उपसा जलसिंचन योजनेच्या पाईपलाईन आहेत. याबाबत महारेलने कोणताही निर्णय जाहीर केलेला नाही. अनेक प्रकल्पांना यापूर्वी आमच्या जमिनींचे संपादन झाले असल्याने रेल्वे प्रकल्पाला आम्ही जमिनी देणार नसल्याची ठाम भूमिका शेतकऱ्यांनी लावून धरल्याने महारेलचे अधिकारी व मोजणी अधिकारी यांना मोजणी न करता माघारी जावे लागले.

यावेळी रेल्वे विरोधी शेतकरी संघर्ष कृती समितीचे जिल्हाध्यक्ष निलेश  भुजबळ, कृती समितीचे पदाधिकारी अनिल वाघुले तसेच शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

 

Web Title: Oppose to Pune-Nashik high speed railway; Farmers stop land survey

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.