परस्पर पुनर्वसनाच्या निर्णयाला विरोध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 5, 2021 04:09 AM2021-04-05T04:09:36+5:302021-04-05T04:09:36+5:30
लष्कर -पुणे महापालिका व झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण हे महामेट्रो प्रकल्पाच्या उभारणीसाठी कामगार वसाहतीमधील नागरिकांना कुठल्याही प्रकारे विश्वासात न घेता ...
लष्कर -पुणे महापालिका व झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण हे महामेट्रो प्रकल्पाच्या उभारणीसाठी कामगार वसाहतीमधील नागरिकांना कुठल्याही प्रकारे विश्वासात न घेता त्यांचे परस्पर पुनर्वसन केले जात आहे. हे पुनर्वसन विमाननगर व हडपसर या ठिकाणी केले जात आहे. त्याच्या विरोधात आज नागरिकांनी आंदोलन केले.
कामगार पुतळा झोपडपट्टी बचाव समिती, पुणे शहरातील विविध सतरा दलित संघटनेच्या वतीने कामगार पुतळा चौक या ठिकाणी समितीच्या अध्यक्षा बायडाबाई पवार, उपाध्यक्षा सखुबाई डेंगळे यांच्या नेतृत्वाखाली ठिय्या आंदोलन करण्यात आले.
समितीच्या अध्यक्षा म्हणाल्या की, आमची पिढी जवळपास ७० वर्षांपासून येथे आहे. आज ४५०० नागरिक येथे राहतात. आमचे पुनर्वसन येथून २ किलोमीटरच्या आताच शिवाजीनगर या परिसरात करावे.
याबाबत हमीद शेख म्हणाले की, आमच्या व्यथा आम्ही महामेट्रो व्यवस्थापक ब्रिजेश दीक्षित यांना देखील सांगितल्या. त्यावर त्यांनी पालकमंत्री अजित पवार यांच्यावर निर्णय ढकलला आहे. त्यांनी तसा आदेश दिला तर आम्ही काम करू, असे ते म्हणाले.