जिल्हाधिकारी कार्यालयासमोर विविध संघटनांची निदर्शने, संतप्त कार्यकर्त्यांनी पेटवले टायर

By ऑनलाइन लोकमत | Published: January 2, 2018 08:11 PM2018-01-02T20:11:49+5:302018-01-02T20:12:30+5:30

कोरेगाव भिमा येथील दोन गटातील संघर्षाचे मंगळवारी पुणे शहरातही पडसाद उमटले. पुणे शहरातील आंबेडकरी चळवळीतील विविध संघटना आणि राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ निदर्शने केली. संतप्त कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी आणि टायर पेटवून निषेध नोंदवला.

Opposing the various organizations in front of the Collector's office, angry workers tired the tire | जिल्हाधिकारी कार्यालयासमोर विविध संघटनांची निदर्शने, संतप्त कार्यकर्त्यांनी पेटवले टायर

जिल्हाधिकारी कार्यालयासमोर विविध संघटनांची निदर्शने, संतप्त कार्यकर्त्यांनी पेटवले टायर

Next

पुणे : कोरेगाव भिमा येथील दोन गटातील संघर्षाचे मंगळवारी पुणे शहरातही पडसाद उमटले. पुणे शहरातील आंबेडकरी चळवळीतील विविध संघटना आणि राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ निदर्शने केली. संतप्त कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी आणि टायर पेटवून निषेध नोंदवला. तर, पीएमपी बसवर दगडफेक करण्यात आली. यावेळी पोलिसांनी तगडा बंदोबस्त ठेवला होता. 
भिमा कोरेगाव येथील विजय स्तंभाला मानवंदना देण्यासाठी राज्यभरातून लाखो अनुयायी येत असतात. सोमवारी याठिकाणी शौर्य दिन साजरा केला जात होता. त्याचवेळी दोन गटात उसळलेल्या संघर्षामधून दंगलसदृश स्थिती निर्माण झाली. त्यामधून वाहनांवर दगडफेक करण्याचे आणि जाळपोळीचे प्रकार घडले. यामध्ये एकाचा बळी गेला तर तीन जण जखमी झाले. या घटनेचे पडसाद मंगळवारी राज्यभर उमटले. 
पुण्यामध्ये काही संवेदनशील भागात पोलिसांनी बंदोबस्त वाढवला होता. मंगळवारी दुपारी चारच्या सुमारास डॉ. आंबेडकर पुतळ्याजवळ सर्व पक्ष संघटनांच्या कार्यकर्त्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला कॉंग्रेसचे शहराध्यक्ष रमेश बागवे, आरपीआयचे परशुराम वाडेकर, शहराध्यक्ष महेंद्र कांबळे, अजयबाप्पू भोसले, मातंग आघाडीचे हनुमंत साठे, शैलेंद्र चव्हाण, रमेश राक्षे, रवी आरडे, विकास सातारकर, बाळासाहेब जानराव, राहूल डंबाळे, वसंतराव साळवे, एल. डी. भोसले आदी आघाडीचे कार्यकर्ते उपस्थित होते. 
बैठक सुरु असतानाच मोठ्या संख्येने कार्यकर्ते येथे जमायला सुरुवात झाली. कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करीत सरकार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा निषेध  नोंदवला. यावेळी संतप्त कार्यकर्त्यांनी सायकलचे टायर जाळले. यावेळी पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. दरम्यान, बैठकीमध्ये आंदोलनाच्या तारखेबाबत एकमत न झाल्याने काही काळ वादही उद्भवला होता. त्यानंतर, संध्याकाळी पुन्हा दुसरी बैठक घेण्याचा निर्णय घेण्यात आला. बुधवारच्या महाराष्ट्र बंदमध्ये सर्वजणांनी सहभागी होण्याचा निर्णय घेतला आहे. या बंदमध्ये आरपीआयसह सर्वच पक्षांचे आणि संघटनांचे कार्यकर्ते सहभागी होणार आहेत. भिमा कोरेगाव येथे घडलेला प्रकार दुर्दैवी असून याबाबत समाजाच्या भावना तीब्र आहेत. याबाबत राज्य पातळीवर तीब्र आंदोलन उभारण्यात येणार असून मिलींद एकबोटे व संभाजी भिडे यांच्यावर मोक्का लावण्यात यावा अशी मागणी कार्यकर्त्यांनी केली. 

- डॉ. आंबेडकर पुतळ्याजवळ आंदोनलाला सुरुवात झाल्यानंतर खबरदारीचा उपाय म्हणून याभागातील वाहतूक अन्य रस्त्यांवरुन वळविण्यात आली. त्यामुळे काही काळ आसपासच्या रस्त्यांवर वाहतूक कोंडी झाली होते.

- प्रवाशांना घेऊन निघालेल्या पीएमपी बसला कार्यकर्त्यांनी अडविले. घाबरलेले प्रवासी बसमधून खाली उतरत गर्दीमधून वाट काढत निघून गेले. चालकानेही खाली उडी मारुन पळ काढला. दरम्यान, कार्यकर्त्यांनी बसवर दगडफेक करण्यास सुरुवात केली. यावेळी एका पोलीस अधिका-याने बसमध्ये चढून स्वत: बस चालवित पाठीमागे घेत सुरक्षित स्थळी नेऊन लावली.

Web Title: Opposing the various organizations in front of the Collector's office, angry workers tired the tire

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.