शाळा सुरू करण्याबाबत संस्थाचालकांकडून विरोध अन‌् स्वागतही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2021 04:15 AM2021-01-16T04:15:18+5:302021-01-16T04:15:18+5:30

याबाबत डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे शरद कुंटे म्हणाले, इयत्ता नववी आणि दहावीच्या विद्यार्थ्यांना शाळेत पाठवण्यास पालकांचा अल्प प्रतिसाद मिळालेला आहे. ...

Opposition and welcome from the principals for starting the school | शाळा सुरू करण्याबाबत संस्थाचालकांकडून विरोध अन‌् स्वागतही

शाळा सुरू करण्याबाबत संस्थाचालकांकडून विरोध अन‌् स्वागतही

Next

याबाबत डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे शरद कुंटे म्हणाले, इयत्ता नववी आणि दहावीच्या विद्यार्थ्यांना शाळेत पाठवण्यास पालकांचा अल्प प्रतिसाद मिळालेला आहे. अद्यापही त्यांची उपस्थिती वाढू शकलेली नाही. अशातच पाचवी ते आठवीच्या विद्यार्थ्यांना पालक शाळेत पाठवण्यास कितपत तयार होतील हा प्रश्न आहे. एकाच वेळी शाळेत आणि ऑनलाइन अशा दोन्ही पद्धतीने मुलांना शिकवणे अत्यंत अवघड असून त्यासाठी पुरेसे शिक्षकही नाहीत. त्यामुळे शासनाच्या निर्णयाच्या अंमलबजावणीत अडचणी येणार आहेत. शासनाने वस्तुस्थिती लक्षात घेणे आवश्यक आहे. फेडरेशन ऑफ असोसिएशन ऑफ प्रायव्हेट एडेड स्कूल या संस्थेचे राजेंद्रसिंह म्हणाले, नववी ते बारावीच्या विद्यार्थ्यांना पालक शाळेत पाठवीत असून ७० ते ८० टक्के उपस्थिती आहे. ज्या ठिकाणी पुरेशी काळजी घेतली घेतली जात नाही अशा मॉल, हॉटेल्स, खेळाचे ठिकाणी आदी ठिकाणी मुले जातात. तर, मग शाळेत पाठविण्यात काहीही अडचण नाही. संघटनेतर्फे या निर्णयाचे आम्ही स्वागत करतो. मुलांची योग्य देखरेख आणि काळजी घेतली जाईल. शासनाचा निर्णय आणि यशस्वी करून दाखवू असे ते म्हणाले.

Web Title: Opposition and welcome from the principals for starting the school

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.