हुंड्याला, हावरेपणाला ‘शरियत’मध्ये विरोध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 5, 2021 04:10 AM2021-03-05T04:10:52+5:302021-03-05T04:10:52+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : अहमदाबादच्या आयेशा अरिफ खान या विवाहितेने पतीला व्हिडीओ पाठवून केलेल्या आत्महत्येचा ‘जमियत ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : अहमदाबादच्या आयेशा अरिफ खान या विवाहितेने पतीला व्हिडीओ पाठवून केलेल्या आत्महत्येचा ‘जमियत उलेमा हिंद’ने तीव्र निषेध केला आहे. सासरकडून मागितलेल्या हुंड्याला, पैसे आणि वस्तूंच्या लालसेला ‘शरियत’मध्ये स्थान नाही, उलट तो गुन्हा समजला जातो असे संस्थेचे जिल्हाध्यक्ष हाफिज महम्मद किफायतुल्लाह यांनी स्पष्ट केले.
किफायतुल्लाह यांनी गुरुवारी (दि. ४) याबाबत पत्रक प्रसिद्धीस दिले. साधेपणाने विवाहाचा आग्रह धरणे, सासरकडून हुंडा, पैसे आणि वस्तूंच्या लालसेला शरियतमध्ये स्थान नसणे याबाबत उलेमांनी शुक्रवारच्या नमाजमध्ये जनजागृती करावी, असे आवाहन यात करण्यात आले आहे.
“या घटनेला धार्मिक रंग देऊ नये. स्त्रीला सर्व धर्मात त्रास दिला जातो तो थांबायला हवा. लग्नानंतर विवाहितांनी एकमेकांच्या भावना समजावून घेऊन वैवाहिक जीवन सुखी करावे. लग्नात मोठेपणाचा देखावा करू नये,” असेही जमियत उलेमा हिंदच्या समाज सुधारणा समितीचे जिल्हाध्यक्ष ॲड. समीर शेख यांनी पत्रकाद्वारे केले आहे.