सौरऊर्जा प्रकल्पाला मच्छीमार संघटनेचा विरोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 18, 2019 11:49 PM2019-02-18T23:49:57+5:302019-02-18T23:50:14+5:30

उजनी धरण : मासेमारी व्यवसायावर होणार विपरीत परिणाम

Opposition to the Fisheries Association of Solar Power Project | सौरऊर्जा प्रकल्पाला मच्छीमार संघटनेचा विरोध

सौरऊर्जा प्रकल्पाला मच्छीमार संघटनेचा विरोध

Next

भिगवण : उजनी धरणात होणाऱ्या तरंगत्या सौरऊर्जा निर्मिती प्रकल्पाला महाराष्ट्र राज्य मच्छीमार संघर्ष कृती समितीने कडाडून विरोध केला आहे. हा प्रकल्प झाला तर मासेमारी करणाºयांच्या जिवावर उदरनिर्वाह करणाºया २५ ते ३० हजार लोकांच्या उपजीविकेचा प्रश्न निर्माण होणार आहे. याबाबत तालुक्याचे आमदार दत्तात्रय भरणे यांना निवेदन देऊन बाजू सरकारच्या समोर मांडण्यास सांगितले.

सरकारने नवीकरणीय ऊर्जा स्रोतापासून वीज निर्मितीचे महत्त्व लक्षात घेत राज्यातील ऊर्जेच्या वाढत्या मागणीच्या पूर्ततेसाठी असे प्रकल्प हाती घेतले असून, यात उजनी धरणातील होणाºया प्रकल्पातील पहिल्या टप्प्यात ५ हजार हेक्टर जलक्षेत्रावर १ हजार मेगावॉट वीजनिर्मिती करण्यात येणार आहे. तर दुसºया टप्प्यात ५ हजार जलक्षेत्रावर १ हजार अशी एकूण १० जलक्षेत्रावर २ मेगावॉट वीजनिर्मिती करण्यात येणार आहे. याचा फायदा प्रामुख्याने उजनी किनारी असणाºया शेतकºयांना दिवसा वीज मिळण्यात होणार आहे. यावेळी महाराष्ट्र राज्य मच्छीमार संघर्ष कृती समितीचे उपाध्यक्ष सीताराम नगरे, कोषाध्यक्ष नंदकुमार नगरे, पुणे जिल्हा अध्यक्ष राजू नगरे, बाजार समितीचे सदस्य आबासाहेब देवकाते, राजेंद्र देवकाते यांनी निवेदन देत आपला विरोध दर्शविला.

यातून मासेमारी व्यवसायावर परिणाम होणार असून, तीस हजार मासेमारी करणारांचा उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण होणार आहे. त्यामुळे स्थानिक मासेमारांनी या प्रकल्पाला विरोध केला आहे. यासाठी गेल्या महिन्यात जलसमाधी आंदोलन करीत प्रकल्प झाला तर आंदोलन आणखी तीव्र करणार असल्याचे जाहीर केले. याबाबत इंदापूर तालुक्याचे आमदार दत्तात्रय भरणे यांना निवेदन देत आपले म्हणणे सरकार दरबारी पोहोचवून प्रकल्प होऊ नये यासाठी प्रयत्न करण्यास सांगितले.
 

Web Title: Opposition to the Fisheries Association of Solar Power Project

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Puneपुणे