नियमबाह्य मंजूर कामावरून विराेधकांनी सत्ताधाऱ्यांना घेरले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 10, 2021 04:13 AM2021-03-10T04:13:42+5:302021-03-10T04:13:42+5:30

जिल्हा नियोजन समितीने जिल्हा परिषदेला ३२१ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे. या निधीमधून जनसुविधा तसेच लेखाशीर्ष ३०-५४ ...

Opposition groups called for a boycott of the assembly | नियमबाह्य मंजूर कामावरून विराेधकांनी सत्ताधाऱ्यांना घेरले

नियमबाह्य मंजूर कामावरून विराेधकांनी सत्ताधाऱ्यांना घेरले

Next

जिल्हा नियोजन समितीने जिल्हा परिषदेला ३२१ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे. या निधीमधून जनसुविधा तसेच लेखाशीर्ष ३०-५४ आणि ५०-५४ अंतर्गत रस्त्यांची कामे मंजुर करण्यासाठी जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेपुढे मांडणे गरजेचे असते. सर्वसाधारण सभेने आराखड्यासह कामांची यादी मंजूर करून ती जिल्हा नियोजन समितीला सादर करणे बंधनकारक आहे. मात्र, कामांच्या यादीची प्रक्रिया पूर्ण न करता तसेच प्रत्यक्षात शिफारस करण्यात आलेली कामे आणि मंजूर करण्यात आलेली कामे यांच्या निधीमध्ये मोठी तफावत आहेत. अनेक कामे चुकीची तसेच आराखड्याच्या आणि सूचीच्या बाहेरची असल्याचे शिवसेनेचे गटनेते देविदास दरेकर, भाजप गटनेते शरद बुट्टे पाटील, अतुल देशमुख, काँग्रेस गटनेते विठ्ठल आवळे, आशा बुचके, अमोल नलावडे यांच्यासह विरोधी पक्षाच्या सदस्यांनी दाखवून दिले. या बाबतचे निवेदन त्यांनी जिल्हा परिषद अध्यक्ष निर्मला पानसरे यांना दिले. यानंतर आक्रमक भुमिका या सदस्यांनी घेतली. अनेक कामे चुकीची झाली आहेत असा आरोप सदस्यांनी केला. यामुळे ती रद्द करावी किंवा त्यांची पडताळणी करून ती मंजुर करण्याची मागणी सदस्यांनी केली. या बाबत अध्यक्ष निर्मला पानसरे यांनी दखल घेत सर्व कामांची पडताळणी करूनच ती मंजुर केले जातील. या सोबतच इतिवृत्तमध्ये यादीसह आराखड्यात समाविष्ट करून त्याला मान्यता दिली जाईल, असे सांगितले. ज्या सदस्यांची कामे मंजूर झाली नाहीत त्यांनी नव्या आराखड्यामध्ये कामांचे प्रस्ताव द्यावेत त्यांची कामे समाविष्ट करून मंजूर केली जातील असेही पानसरे यांनी स्पष्ट केले.

चौकट

अनेक वेळा पत्रव्यवहार करून देखील मागील वर्षीच्या पुरात पडझड झालेल्या स्मशानभूमींच्या दुरूस्तीसाठी कोणताच निधी उपलब्ध करून दिला गेला नाही. तसेच शाळा दुरूस्तीची कामे प्रलंबित ठेवण्यात आली आहेत. नवीन अंगणवाडीचे प्रस्ताव देखील डावलण्यात आले. भाजपच्या जिल्हा परिषद सदस्यांचा निधी संगनमताने रोखला जातोय, असा आरोप करत भाजपच्या जिल्हा परिषद महिला सदस्यांनी अर्थसंकल्प सादर करण्यापूर्वी सभागृहात जोरदार घोषणाबाजी केली.

भाजपच्या महिला सदस्यांनी आमच्या गावांवर अन्याय होत असल्याचे सांगून खुर्च्यांवर न बसता त्यांनी खाली जमिनीवर बसणे पसंत केले. महानगरपालिकेत जाण्याआधीच हक्काचा फंड रोखून जिल्हा परिषदेने गावांना वाऱ्यावर सोडल्याने जिल्हा परिषद सर्वसाधारण सभेच्या वेळी भारतीय जनता पक्ष्ाच्या जिल्हा परिषद महिला सदस्यांनी जिल्हा परिषदेवर मोर्चा नेवून पुणे जिल्हा परिषदेच्या भोंगळ कारभाराचे वाभाडे काढले. यावेळी जिल्हा परिषदेच्या सदस्या जयश्री भूमकर, जयश्री पोकळे, वंदना कोद्रे, अलका धानवले उपस्थित होत्या.

Web Title: Opposition groups called for a boycott of the assembly

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.