पीएमपी विभाजनाला स्वयंसेवी संस्थांचा विरोध
By Admin | Published: November 24, 2014 11:50 PM2014-11-24T23:50:44+5:302014-11-24T23:50:44+5:30
पीएमपीचे विभाजन केल्याने प्रवाशांना चांगली सेवा मिळण्याची शक्यता नसून, हा उपाय होऊ शकत नसल्याने त्याला अनेक स्वयंसेवी संस्थांनी विरोध केला आह़े
पुणो : पीएमपीचे विभाजन केल्याने प्रवाशांना चांगली सेवा मिळण्याची शक्यता नसून, हा उपाय होऊ शकत नसल्याने त्याला अनेक स्वयंसेवी संस्थांनी विरोध केला आह़े
पुणो, पिंपरी चिंचवड, तिन्ही कँटोन्मेंट आणि जवळच्या ग्रामीण भागाला चांगली बससेवा मिळावी, यासाठी पीएमटी आणि पीसीएमटीचे विलीनीकरण करून पीएमपीएमएल कंपनी स्थापन करण्यात आली आह़े मात्र, कंपनी चांगली सेवा देण्यास अपयशी ठरल्याने पीएमपीचे विभाजन करून पुन्हा त्या स्वतंत्रपणो चालवाव्यात असा प्रस्ताव तयार करण्यात आला आह़े याला पेडेस्टियन फस्टचे प्रशांत इनामदार, नागरिक चेतना मंचचे मेजर जनरल एस सी एन जठार (निवृत्त), नॅशनल सोसायटी फॉर क्लिन सिटीजचे सतीश खोत, परिसरचे सुजित पटवर्धन, पीएमपी प्रवासी मंचचे जुगल राठी, सेव्ह पुणो ट्रॅफिक मूव्हमेंटचे राजेंद्र सिधये, सजग नागरी मंचचे विवेक वेलणकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून याबाबत विरोध दर्शविला आह़े
कंपनीचे विभाजन केल्याने त्यातून काहीही साध्य होणार नाही़ पीएमपीला तज्ज्ञ व्यावसायिक व्यवस्थापन तसेच मुख्य व्यवस्थापकीय संचालक, तीन तज्ज्ञ संचालक, व्यवस्थापक देऊन आवश्यक तेवढा निधी दोन्ही महापालिका आणि राज्य शासनाने पुरविणो आवश्यक आहे, तरच कंपनी चांगली सेवा देऊ शकेल, असे या संस्थांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आह़े
4दोन्ही महापालिका आणि राज्य शासनाचे वेळेवर पाठबळ मिळत नसल्यानेच कंपनी चांगली सेवा देऊ शकत नाही़ कंपनीला चांगले व्यवस्थापन, मूलभूत सोयीसुविधा आणि आर्थिक पाठबळ मिळत नसल्यानेच पुणोकरांना अपेक्षित असलेली सेवा कंपनी देऊ शकत नाही़