शरद पोंक्षे यांच्या कार्यक्रमाला पुण्यात विरोध ; कार्यक्रम करण्यावर आयोजक ठाम 

By ऑनलाइन लोकमत | Published: February 29, 2020 04:08 PM2020-02-29T16:08:35+5:302020-02-29T16:10:03+5:30

पुण्यात काही वेळात होणाऱ्या स्वातंत्रवीर सावरकर यांच्यावर आधारित व्याख्यानाच्या कार्यक्रमासाठी अभिनेते, व्याख्याते शरद पोंक्षे हजेरी लावणार असताना हा कार्यक्रम रद्द करावा अशी मागणी काही संघटनांनी केली आहे.

Opposition to Sharad Ponkshe's program in Pune; The organizer is sure to do the event | शरद पोंक्षे यांच्या कार्यक्रमाला पुण्यात विरोध ; कार्यक्रम करण्यावर आयोजक ठाम 

शरद पोंक्षे यांच्या कार्यक्रमाला पुण्यात विरोध ; कार्यक्रम करण्यावर आयोजक ठाम 

Next

पुणे :पुण्यात काही वेळात होणाऱ्या स्वातंत्रवीर सावरकर यांच्यावर आधारित व्याख्यानाच्या कार्यक्रमासाठी अभिनेते, व्याख्याते शरद पोंक्षे हजेरी लावणार असताना हा कार्यक्रम रद्द करावा अशी मागणी काही संघटनांनी केली आहे. काल इंदोरीकर महाराज यांचा कार्यक्रम कोल्हापूर येथे रद्द झाल्यावर आज पुण्यात पोंक्षे यांचा कार्यक्रम होऊ नये यासाठी काही संघटना पुढे आल्या आहेत. त्यामुळे दोन दिवसात घडलेली घटना 

फर्ग्युसन महाविद्यालयाच्या अँफी थिएटरमध्ये काही वेळात मी सावरकर हे पोंक्षे यांचे व्याख्यान होणार असून त्यापूर्वी वक्तृत्व स्पर्धांचा पारितोषिक वितरण समारंभ पार पडणार आहे .मात्र हा कार्यक्रम रद्द करण्याची मागणी आरपीआयच्या खरात गटाचे अध्यक्ष सचिन खरात यांनी केली आहे. आयोजकांनी कार्यक्रम रद्द करणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. अखेर कोणताही गोंधळ होऊ नये म्हणून कार्यक्रम ठिकाणी पोलीस बंदोबस्त बोलावण्यात आला आहे. 

याबाबत बोलताना खरात यांनी लोकमतला  सांगितले की, 'जगाला गौतम बुद्धांच्या अहिंसेची गरज आहे. यामुळे धार्मिक आतंकवादी तयार होतील. हिंसेला समर्थन देणाऱ्या शरद पोंक्षे यांनी अटक करावी व कार्यक्रम रद्द करावा. आयोजकांशी संपर्क साधला तर त्यांनी लोकमतला सांगितले की, 'आजचा कार्येक्रम ठरल्याप्रमाणेच होणार आहे. समाज विघातक आणि वीर सावरकरांचा सतत द्वेष करणाऱ्या लोकांच्या धमक्यांना सावरकर प्रेमी घाबरत नाहीत'. 

Web Title: Opposition to Sharad Ponkshe's program in Pune; The organizer is sure to do the event

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.