वाघापूरचाही विमानतळाला विरोध
By Admin | Published: October 11, 2016 01:43 AM2016-10-11T01:43:13+5:302016-10-11T01:43:13+5:30
पुरंदर तालुक्यात आंतरराष्ट्रीय विमानतळ होणार असल्याचे जाहीर झाल्यापासून राजेवाडी, आंबळे पारगाव, एखतपूर, खानवडी, मुंजवडी
राजेवाडी : पुरंदर तालुक्यात आंतरराष्ट्रीय विमानतळ होणार असल्याचे जाहीर झाल्यापासून राजेवाडी, आंबळे पारगाव, एखतपूर, खानवडी, मुंजवडी या गावांनी विमानतळाला ग्रामसभा बोलावून एकमुखी तीव्र विरोध केला आहे. सोमवारी वाघापूर गावानेही विशेष ग्रामसभा बोलावून विमानतळाला तीव्र विरोध केला असल्याचे जाहीर केले आहे. यामुळे विमानतळाला सातही ग्रामपंचायतींचा विरोध झाला आहे.
या वेळी ग्रामसभेत पंकज थोरात, गौरव कुंजीर, माजी सरपंच बाजीराव कुंजीर, माजी उपसरपंच बाळासाहेब कुंजीर, बबन अप्पा इंदलकर, वकील नितीन कुंजीर, अश्विनी इंदलकर, दत्तात्रेय गायकवाड, अंजली कुंजीर, पूजा कुंजीर यांची संतापजनक भाषणे झाली.
या वेळी सरपंच छायाताई वाघमारे, उपसरपंच अशोक कुंजीर, ग्रामपंचायत सदस्य प्रवीण कुंजीर, सारिका कुंजीर, अंजली कुंजीर, शोभा कुंजीर, स्वाती गाडेकर, विशाल दीक्षित, माजी उपविभागीय पोलीस अधिकारी कृष्णाजी इंदलकर, तंटामुक्तीचे माजी अध्यक्ष रमेश कुंजीर, लालू अण्णा इंदलकर, मनोज कुंजीर, संतोष कुंजीर, शहाजी कुंजीर, पोलीस पाटील विजय कुंजीर,अरुण कुंजीर, किरण कड, बापू गायकवाड, सुमन कुंजीर, शिवाजी इंदलकर, शहाजी कुंजीर यांच्यासह ग्रामसेविका एस. बी. लोंढे व ग्रामस्थ, महिला आणि शेतकरी उपस्थित होते. दत्ता कुंजीर यांनी प्रास्ताविक केले. नितीन कुंजीर यांनी आभार मानले.