कापडी पिशव्यांच्या बॅँकेचा पर्याय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2018 03:22 AM2018-05-23T03:22:50+5:302018-05-23T03:22:50+5:30

औंधमधील इरेना टॉवर सोसायटीमधे कापडी पिशव्यांची बॅँक तयार करण्यात येत आहे.

Option of cloth bags | कापडी पिशव्यांच्या बॅँकेचा पर्याय

कापडी पिशव्यांच्या बॅँकेचा पर्याय

googlenewsNext

पाषाण : प्लॅस्टिकच्या पिशव्या बंद झाल्यानंतर नागरिकांना दुसरा पर्याय हवा होता. आजदेखील पर्याय नसल्याने अनेक जण प्लॅस्टिकच्या पिशव्यांचा वापर करीत आहेत. आता यावर कापडी पिशव्यांची बॅँक करण्याचा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. त्यामुळे प्लॅस्टिक पिशव्या वापरण्याचे बंद होऊन कापडी पिशव्यांचा वापर वाढू शकतो.
औंधमधील इरेना टॉवर सोसायटीमधे कापडी पिशव्यांची बॅँक तयार करण्यात येत आहे. इरेना टॉवर ही २८० फ्लॅटची सोसायटी आहेत. पर्यावरणपूरक उपक्रमात सहभागी होत सोसायटीमधील नागरिकांनी प्रत्येक फ्लॅटमध्ये कापडी पिशव्या वापर वाढविण्याचे प्रयत्न सुरू केले. कापडी पिशव्यांची बॅँक तयार करण्यात आली. सोसायटीतल्या लोकांनी काही फ्लॅटसाठी सोसायटीचे नाव असलेल्या आकर्षक कापडी पिशव्या तयार केल्या आहेत. पर्यावरण दिनानिमित्त सर्व फ्लॅटमध्ये कापडी पिशव्या वापरण्याचा संकल्प सोसायटीच्या सभासदांनी केला आहे. समर्थ भारतने केलेल्या पर्यावरणपूरक उपक्रमामुळे कापडी पिशवी बँक तयार होते आहे, असे सामाजिक कार्यकर्ते गणेश कलापुरे यांनी सांगितले.
शुभा कुलकर्णी, अभिलाषा वर्मा आणि स्वाती कुलकर्णी या सोसायटीतील गृहिणींनी याबाबत पुढाकार घेतला आहे आणि प्रत्येक कुटुंबात कापडी पिशवी वापर व्हावा, म्हणून त्या प्रयत्न करीत आहेत. औंधमधील इरेना टॉवर सोसायटी २८० फ्लॅटची आहे तिथे शुभारंभ झाला आहे. आत्तापर्यंत सोसायटीतल्या लोकांनी ३० पिशव्या तयार केल्या आहेत. अजून करणार आहेत. लोक पिशव्या तयार करीत आहेत आणि कापडी पिशवी बँक तयार होत आहे.

१०० सोसायट्यांमध्ये कापडी पिशवी बँक
प्लॅस्टिकबंदीच्या पार्श्वभूमीवर लोकांनी प्लॅस्टिक पिशवीऐवजी कापडी पिशवीचा वापर करावा, या उद्देशातून समर्थ भारत आणि पर्यावरण क्षेत्रात काम करणाऱ्या विविध स्वयंसेवी संस्थांनी मिळून कापडी पिशवी बँक हा अभिनव उपक्रम राबविला आहे.
५ जून जागतिक पर्यावरण दिन आहे. या वर्षी या दिनाचा यजमान भारत देश आहे, याचे औचित्य साधून हा उपक्रम पुणे शहराच्या किमान १०० सोसायट्यांत कापडी पिशवी बँक हा उपक्रम राबविला जाणार आहे. प्लॅस्टिकबंदी, प्लॅस्टिक निर्मूलन, पर्यावरणरक्षण आणि प्रदूषणमुक्त नदी होण्यासाठी या उपक्रमाचा निश्चितच चांगला उपयोग होईल. हा उपक्रम लोकांनी लोकांसाठी राबविला आहे आणि प्रदूषणमुक्तीसाठी ही एक मोठी चळवळ उभी राहत आहे. यात विविध निवासी सोसायट्यांनी आपला सहभाग वाढवावा, असे गणेश कलापुरे म्हणाले.
 

Web Title: Option of cloth bags

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.