सखोल चौकशीचे आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 30, 2020 04:16 AM2020-12-30T04:16:34+5:302020-12-30T04:16:34+5:30

सहायक पोलीस आयुक्तांनी या घटनेचा अहवाल दिला आहे. याबाबत सह पोलीस आयुक्त डॉ. रवींद्र शिसवे यांनी सांगितले की, पोलिसंच्या ...

Order of in-depth inquiry | सखोल चौकशीचे आदेश

सखोल चौकशीचे आदेश

Next

सहायक पोलीस आयुक्तांनी या घटनेचा अहवाल दिला आहे.

याबाबत सह पोलीस आयुक्त डॉ. रवींद्र शिसवे यांनी सांगितले की, पोलिसंच्या दृष्टीने ही दुदैवी घटना आहे. ही घटना पोलिसांनी गांभीर्याने घेतली आहे. या घटनेचे सखोल चौकशीचे आदेश दिले आहेत. आपण स्वत: चतु:श्रृंगी पोलीस ठाण्याला भेट देऊन या संपूर्ण घटनेची माहिती घेत आहे. या पोलीस कर्मचार्यांवर निश्चितच कारवाई होणार आहे. त्याचबरोबर हा गुन्हा उघडकीस आणून लवकरात लवकर गुन्हेगारांना अटक करण्याचा पोलिसांचा प्रयत्न आहे.

...........

दरवर्षी पोलिसांना दिले जाते प्रशिक्षण

शहरात प्रत्येक पोलीस ठाण्याच्या हद्दीत नाईट राऊंडला किमान दोन मार्शलांची नेमणूक केलेली असते. ते शस्त्रांनी सज्ज असतात. या पोलीस मार्शल यांना दरवर्षी फायरिंगचे प्रशिक्षणही दिलेले असते. त्याचबरोबर स्वरंक्षणासाठी शस्त्राचा वापर कसा करायचा. त्यासाठी कायद्यात काय तरतुद आहे, याची त्यांना संपूर्ण माहिती दिली जाते. त्याचबरोबर त्यांच्याकडील शस्त्रांची नियमित देखभाल केली जाते, असे पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले.

अनेकदा पोलीस अधिकारी, कर्मचारी गुन्हेगारांना पकडताना जीवावर उदार हाेत असल्याचे यापूर्वी काही घटनांमध्ये दिसून आले आहे. या पोलिसांकडे शस्त्र असतानाही त्यांना काहीच कसा प्रतिकार केला नाही, याचीच चर्चा आज दिवसभर पोलीस दलात सुरु होती.

Web Title: Order of in-depth inquiry

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.