तरडे गावातील रस्त्याच्या दर्जाची चौकशी करण्याचे आदेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 2, 2021 04:09 AM2021-07-02T04:09:25+5:302021-07-02T04:09:25+5:30
जिल्हा परिषद पुणे अंतर्गत २५/ १५ रस्ता मंजूर करण्यात आला आहे. सदरील रस्त्याचे काम उंद्रे व देवकर या ...
जिल्हा परिषद पुणे अंतर्गत २५/ १५ रस्ता मंजूर करण्यात आला आहे. सदरील रस्त्याचे काम उंद्रे व देवकर या दोन ठेकेदारांनी घेतले आहे. परंतु एकच महिन्यात हा रस्ता खराब होवून वाहतुकीस अयोग्य झाल्याने ग्रामस्थांनी याबाबत तक्रार केली आहे. रस्त्याचे काम अत्यंत निकृष्टपणे झाल्याने पूर्ण रस्ता एक महिन्यात खराब झाला आहे. सदर रस्त्याची पाहणी करण्यासाठी व जोपर्यंत रस्त्याचे काम पुन्हा दर्जेदार होत नाही तोपर्यंत सदर ठेकेदाराचे बिल थांबवण्याची विनंती तरडे ग्रामस्थांच्या वतीने आमदार अशोक पवार यांना निवेदन देवून करण्यात आली आहे. दरम्यान सदर रस्त्याचे काम निकृष्ट झाल्याचा ग्रामस्थांच्या निवेदनावर समजल्याने ठेकेदारांवर कारवाई करण्याचे व रस्ता जोपर्यंत ठेकेदार शासनाच्या दर्जाप्रमाणे करून देत नाहीत तोपर्यंत त्यांची या कामाची देयके थांबवावीत, असे आदेश आमदार पवार यांनी जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता युवराज देसाई यांना दिले आहेत.
ग्रामस्थांच्या वतीने सदरची मागणी राष्ट्रवादी काँग्रेस सोशल मीडिया उपाध्यक्ष अनिल जगताप, अजय गाढवे, रूपक गवते, काळूराम कुरकुंडे, संजय जगताप, चंपक गवते यांनी केली आहे.