फरकाची रक्कम देण्याचे आदेश

By admin | Published: December 6, 2014 10:44 PM2014-12-06T22:44:54+5:302014-12-06T22:44:54+5:30

सोमेश्वर कारखान्याने मागील हंगामातील 2 हजार 136 रुपये ही एफआरपी चुकीची असल्याचे मान्य केले आहे.

The order to pay the difference | फरकाची रक्कम देण्याचे आदेश

फरकाची रक्कम देण्याचे आदेश

Next
सोमेश्वरनगर  : सोमेश्वर कारखान्याने मागील हंगामातील 2 हजार 136 रुपये ही एफआरपी चुकीची असल्याचे मान्य केले आहे. त्यामुळे साखर आयुक्तांनी सोमेश्वर कारखान्याने प्रतिटनी 2 हजार 257 रुपयांनी एफआरपी (किमान निर्धारित मूल्य) द्यावे, असे स्पष्ट आदेश दिले आहेत. त्यामुळे ‘सोमेश्वर’ला प्रतिटन 121 रुपयांचा दणका बसणार आहे. यामुळे सभासदांच्या झोळीत मात्र 12 कोटी रुपये पडणार आहेत. 
शेतकरी कृती समितीचे नेते सतीश काकडे यांनी वारंवार साखर आयुक्त व प्रादेशिक सहसंचालकांकडे पाठपुरावा केला होता. याबाबत साखर आयुक्तांनी प्रादेशिक संचालकांना पाठविलेल्या दि. 2 डिसेंबरच्या पत्रत म्हटले आहे, सोमेश्वर कारखान्याने सन 2क्13-14 या हंगामामध्ये गळितास आलेल्या उसाकरिता अदा केलेल्या एफआरपी ऊसदाराबाबत शेतकरी कृती समिती यांच्या तक्रारीच्या अनुषंगाने या कार्यालयात सुनावणी घेण्यात आलेल्या आहेत. सदर सुनावणीत साखर आयुक्त यांनी दिलेल्या आदेशानुसार थकीत एफआरपी वसुलीचा व आर.आर.सी.चा प्रस्ताव तत्काळ या कार्यालयाकडे सादर करण्याचे आदेश दिले आहेत.  एफआरपी फरकाची रक्कम एकूण गाळप 8 लाख 82 हजार 773 मे. टन गाळपासाठी 1क् कोटी 68 लाख 15 हजार 614 रुपये आहे. व व्याजाची रक्कम 72 लाख 14 हजार 146 इतकी आहे. दोन्ही बाबींची होणारी रक्कम 11 कोटी 4क् लाख 29 हजार 761 इतकी आहे.  (वार्ताहर)
 
उसाच्या आधारभूत किमतीची अंमलबजावणी करा
4विशेष लेखापरीक्षक  ए. एम. देशमुख यांनी दि. 3 डिसेंबर रोजी सोमेश्वर कारखान्याने कार्यकारी संचालकांना थकीत एफआरपीचा आर.आर.सी. प्रस्ताव पाठविण्याबाबत पत्रव्यवहार केला आहे. तत्पूर्वी दि. 1 सष्टेंबर रोजी प्रादेशिक संचालकांनी साखर आयुक्तांना दिलेल्या पत्रत म्हटले आहे. 
4सोमेश्वर कारखान्याने गळीत हंगाम सन 2क्13-14मधील पंधरवडानिहाय ऊस गाळप, अदा केलेली ऊस किंमत, निव्वळ एफआरपी प्रतिटन 2257 रुपये गृहीत धरून होणारी ऊस फरकाची रक्कम रुपये 1क् कोटी 68 लाख 15 हजार 615 इतकी होत आहे. त्यावरील 15 टक्के दराने दि. 31 ऑगस्ट 2क्14 र्पयतचे एकूण 12 गळीत पंधरवडय़ाचे व्याज 72 लाख 14 हजार 146 रुपये इतके होत आहे. 
4त्याव्यतिरिक्त दि. 16 नोव्हेंबर 13 ते 15 जानेवारी 14 या चार पंधरवडय़ाचे व्याज 557 रुपयांप्रमाणो उशिरा बँकेत वर्ग केलेल्या एफआरपीची होणारी रक्कम दिवसांनुसार 39 लाख 66 हजार 949 रुपये इतकी आहे आणि दि. 16 जानेवारी 14 ते 28 फेब्रुवारी 14 या तीन पंधरवडय़ाचे एफआरपीप्रमाणो उशिरा दिलेल्या ऊसबिल रकमेवरील व्याजाची रक्कम 28 लाख 31 हजार 889 रुपये इतकी आहे. 
 
नुकत्याच झालेल्या वार्षिक सभेत सभासदांना 121 रुपये मिळवून देणार, असा शब्द दिला होता. त्यामुळे कारखान्याने 15 दिवसांत आयुक्तांच्या आदेशाची अंमलबजावणी करावी.
- सतीश काकडे, शेतकरी कृती समिती 

 

Web Title: The order to pay the difference

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.