फाइन आर्ट्सचे प्रवेश थांबविण्याचे आदेश
By admin | Published: June 29, 2017 03:47 AM2017-06-29T03:47:54+5:302017-06-29T03:47:54+5:30
आॅल इंडिया कौन्सिल आॅफ टेक्निकल एज्युकेशनच्या (एआयसीटीई) मान्यतेशिवाय सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाशी संलग्न
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : आॅल इंडिया कौन्सिल आॅफ टेक्निकल एज्युकेशनच्या (एआयसीटीई) मान्यतेशिवाय सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालयांमध्ये सुरू असलेले बॅचलर आॅफ फाइन आटर््स (बीएफए) इन स्कल्पचर तसेच पेंटिंग अभ्यासक्रम आणि मास्टर आॅफ
फाइन आर्ट्स (एमएफए) या अभ्यासक्रमांचे प्रवेश तत्काळ थांबवावेत, असे आदेश विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांनी दिले आहेत.
एआयसीटीईच्या मान्यतेशिवाय बीएफए इन स्कल्पचर तसेच
पेंटिंग अभ्यासक्रम व मास्टर आॅफ फाइन आर्ट्स हे अभ्यासक्रम सुरू करता येत नाहीत. तसेच, राज्य शासन आणि सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार या अभ्यासक्रमांचे
प्रवेश सीईटीच्या गुणांच्या आधारे
देणे आवश्यक आहे. मात्र, विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालयांमध्ये केवळ बारावीच्या गुणांच्या आधारे हे प्रवेश दिले जात आहेत. त्यामुळे करमळकर यांनी संबंधित महाविद्यालयांना प्रवेश थांबविण्याचे आदेश दिले आहेत.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठासह राज्यातील इतरही काही विद्यापीठांमध्ये एआयसीटीईची परवानगी न घेता या अभ्यासक्रमांना प्रवेश दिले जात असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे पुणे व नाशिक या जिल्ह्यांतील संलग्न महाविद्यालयांची प्रवेशप्रक्रिया थांबणार आहे. मात्र,
पुणे विद्यापीठाप्रमाणे इतर विद्यापीठांकडून प्रवेशप्रक्रिया वेळेत थांंबविली जाणार का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.