नामांकित कंपनीच्या अँपवरून कंबरेचा बेल्ट मागवणे पडले महागात; २०६ चा बेल्ट पडला १ लाखाला

By भाग्यश्री गिलडा | Published: July 11, 2024 05:37 PM2024-07-11T17:37:04+5:302024-07-11T17:37:30+5:30

सायबर चोरट्यांनी कस्टमर केअरमधून बोलत असल्याचे ज्येष्ठ नागरिकाची फसवणूक करत १ लाख लुटले

Ordering a waist belt from a reputed company is expensive; Belt of 206 fell for 1 lakh | नामांकित कंपनीच्या अँपवरून कंबरेचा बेल्ट मागवणे पडले महागात; २०६ चा बेल्ट पडला १ लाखाला

नामांकित कंपनीच्या अँपवरून कंबरेचा बेल्ट मागवणे पडले महागात; २०६ चा बेल्ट पडला १ लाखाला

पुणे : एका नामांकित कंपनीच्या अप्लिकेशनवरून ऑनलाईन लांबरेच बेल्ट मागवणे महागात पडले आहे. कोंढवा परिसरात राहणाऱ्या एकाची चक्क १ लाख ११ हजार रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे. 

अधिक माहितीनुसार, भाग्योदयनगर परिसरात राहणाऱ्या एका ६४ वर्षीय व्यक्तीने कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हा प्रकार १० मे २०२४ ते २८ मे २०२४ यादरम्यानच्या काळात घडला आहे. फिर्यादींनी मिशो नावाच्या कंपनीच्या ऍपवर कंबरेचा बेल्ट ऑर्डर केला होता. मात्र सादर अप्लिकेशनवर बेल्ट उपलब्ध नसल्याने फिर्यादींनी ऑर्डर रद्द केली. फिर्यादींना ऑर्डरचे रिफंड न मिळाल्याने त्यांनी गुगलवरून कस्टमर केअरचा नंबर शोधला. सायबर चोरट्यांनी कस्टमर केअरमधून बोलत असल्याचे सांगितले. तुमची अडचण दूर करण्यासाठी एक लिंक पाठवत आहोत. त्यावर क्लिक करून अप्लिकेशन डाउनलोड करा, असे सांगितले. फिर्यादींनी अप्लिकेशन डाउनलोड केल्यावर समोरील व्यक्तीने त्यांच्या मोबाइलचा संपूर्ण ताबा मिळवला. तुमच्या खात्यावर पैसे पाठवले आहेत चेक करा, असे सांगून बँक खात्याची खासगी माहिती चोरली. खासगी माहितीचा वापर करून फिर्यादींच्या बँक खात्यातून १ लाख ११ हजार रुपये परस्पर ट्रान्स्फर करून घेतले. याप्रकरणाचा पुढील तपास पोलिस निरीक्षक पाटील करत आहेत.

Web Title: Ordering a waist belt from a reputed company is expensive; Belt of 206 fell for 1 lakh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.