आरोग्यसेवेच्या वाढत्या दरांमुळे सामान्यांचे स्वत:च्या आरोग्याकडे दुर्लक्ष : मुक्ता टिळक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 11, 2021 04:13 AM2021-02-11T04:13:19+5:302021-02-11T04:13:19+5:30
नवचैतन्य क्रीडा संघातर्फे स्व. सुरेश माळवदकर यांच्या स्मरणार्थ सेनादत्त पेठेमध्ये मोफत नेत्र व दंत तपासणी शिबिराचे आयोजन केले. यावेळी ...
नवचैतन्य क्रीडा संघातर्फे स्व. सुरेश माळवदकर यांच्या स्मरणार्थ सेनादत्त पेठेमध्ये मोफत नेत्र व दंत तपासणी शिबिराचे आयोजन केले. यावेळी उपमहापौर सरस्वती शेंडगे, पुणे मनपा सभागृह नेते धीरज घाटे, नगरसेवक राजेश येनपुरे, आनंद रिठे, स्मिता वस्ते, भाजप कसबा मतदारसंघाचे अध्यक्ष प्रमोद कोंढरे, विनोद वस्ते, भाजप ओबीसी आघाडी अध्यक्ष योगेश पिंगळे, उपाध्यक्ष ओंकार माळवदकर उपस्थित होते.
सेनादत्त पेठेतील सुमारे ३५० नागरिकांनी नेत्र व दंत तपासणी करून घेतली. ए. एस. जी. व डॉ. केतन आवारे या डॉक्टरांच्या सहकार्याने हे शिबिर राबवले. आरोग्य तपासणीसोबतच मोफत चष्मे वाटपदेखील केले. संघाचे सुरेश म्हालिम, विश्वनाथ रासकर, मुकुंद रणपिसे, नितीन देशपांडे, विजय शेळके, विजय घोलप यांसह सर्व कार्यकर्त्यांनी नियोजनात सहभाग घेतला.