महापालिका रूग्णालयांच्या गलथान कारभारामुळे सामान्य पुणेकरांचा जीव धोक्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 26, 2018 05:26 PM2018-03-26T17:26:04+5:302018-03-26T17:26:04+5:30
नगरसेविका अश्विनी लांडगे यांनी सभागृहात डॉक्टारांच्या हलगर्जीपणामुळे प्रस्तुतीसाठी आलेल महिलेचा व बाळाचा मृत्यू झाला ही अत्यंत खेदाची गोष्ट असून संबंधित डॉक्टरवर त्वरित कारवाई करण्याची मागणीचा प्रश्न उपस्थित केला.
पुणे: महापालिकेच्या आरोग्य प्रमुखाचे पद तीन वर्षांपासून रिक्त आहे.अनेक रुग्णालयात डॉक्टरची कमतरता, वेळेवरऔषधे उपलब्ध नाही,स्वच्छतेचा अभाव यांसारख्या बाबींकडे महापालिका प्रशासन वारंवार दुर्दैेवी घटना घडून देखील अशा रुग्णालयांकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे. महापालिका रूग्णालयातील गलथान कारभारामुळे सामान्य पुणेकरांचा जीव मात्र,धोक्यात आला आहे,अशा संतप्त प्रतिक्रिया महापालिकेच्या सभागृहात उमटल्या.
येरवडा येथील राजीव गांधी रुग्णालयात डॉक्टर वेळेवर न आल्याने प्रसुतीसाठी आलेल्या आई व बाळाचा मृत्यू झाला होता. यासंबंधित डॉक्टराला त्वरित निलंबित करण्याची मागणीही यावेळी करण्यात आली. ती मान्य करत तेथील संबंधित डॉक्टरवर निलंबनाची कारवाई देखील करण्यात आली. येरवडा येथील महापालिकेच्या राजीव गांधी रूग्णालयामध्ये प्रस्तुतीसाठी आलेल्या महिलेला डॉक्टर नसल्याने वेळेवर उपचार मिळाले नाही. नगरसेविका अश्विनी लांडगे यांनी सभागृहात डॉक्टारांच्या हलगर्जीपणामुळे प्रस्तुतीसाठी आलेल महिलेचा व बाळाचा मृत्यू झाला ही अत्यंत खेदाची गोष्ट असून संबंधित डॉक्टरवर त्वरित कारवाई करण्याची मागणीचा प्रश्न उपस्थित केला. त्यानंतर सर्व सदस्यांनी प्रामुख्याने महिला सदस्यांनी तीव्र भावना व्यक्त केल्या. स्मार्ट शहर, मेट्रो सिटी म्हणून मिरवणाºया पुणे शहरांमध्ये २१ व्या शकतात वेळेवर उपचार न मिळाल्याने जीव गमावावा लागतो ही अत्यंत दु:खद गोष्ट आहे. पन्नास लाख लोकसंख्या असलेल्या महापालिकेला आरोग्य प्रमुख मिळत नाहीत. शहरातील महापालिकेच्या सर्वच रूग्णालयाची वाईट स्थितीत आहेत. डॉक्टर,तज्ञ डॉक्टर, नर्स व अन्य कर्मचारी मिळत नाही. रूग्णालयाची सुरक्षाचे प्रश्न ऐरणीवर असून कोट्यवधी रूपयांच्या मशिन उपलब्ध करून दिल्या पण वापरणारे तज्ज्ञ लोक नसल्याने पडून आहेत. याबाबत सत्ताधारी सदस्यांसह सर्वांनी प्रचंड तीव्र शब्दात निषेध केला. महापालिकेच्या रूग्णालयाचा कारभारा बाबत विरोधी सदस्य संजय भोसले, अरविंद शिंदे, प्रशांत जगताप यांनी प्रशासनाला व सत्ताधारी भाजपला धारेवर धरले.