देशात जैव शेतीचे प्राबल्य वाढेल : बुधाजीराव मुळीक

By ऑनलाइन लोकमत | Published: August 16, 2019 11:15 AM2019-08-16T11:15:59+5:302019-08-16T11:23:28+5:30

आगामी वर्षामधे शेतीमध्ये आमूलाग्र बदल होतील. ते देखील ग्राहकामुळेच. ग्राहकच सेंद्रीय मालाला अधिक पसंती देतील.

Organic farming will increase in the country: Budhajirao Mullick | देशात जैव शेतीचे प्राबल्य वाढेल : बुधाजीराव मुळीक

देशात जैव शेतीचे प्राबल्य वाढेल : बुधाजीराव मुळीक

googlenewsNext
ठळक मुद्देशेतीत तंत्रज्ञानाच्या वापरात होणार वाढ स्वातंत्र्यानंतर शेती आणि पुरक व्यवसायांनी अनेक स्थित्यंतरे सेंद्रीय पदार्थांच्या मागणीत येत्या काळात वाढ होणार

पुणे : शेतकरी आत्महत्या...शेतीमालाला मिळणारा कवडीमोल भाव...जल प्रदुषण आणि रासायनिक खतांच्या वापरामुळे विषयुक्त झालेला शेतमाल...असे सध्याच्या शेतीचे वर्णन करता येईल. मात्र, आगामी वर्षामधे शेतीमध्ये आमूलाग्र बदल होतील. ते देखील ग्राहकामुळेच. ग्राहकच सेंद्रीय मालाला अधिक पसंती देतील. त्यामुळे भविष्यात जैव शेतीला मागणी वाढणार असून, अनेक बड्या कंपन्यादेखील यात रस घेतील, असे भाकीत प्रसिद्ध कृषी तज्ज्ञ डॉ. बुधाजीराव मुळीक यांनी व्यक्त केले. 
दहा वर्षांनतर देशातील शेती कशी असेल, याचा अंदाज डॉ. मुळीक यांनी लोकमतकडे व्यक्त केला. स्वातंत्र्यानंतर शेती आणि पुरक व्यवसायांनी अनेक स्थित्यंतरे पाहिली आहेत. त्यात १९५०च्या दशकातील धान्य उत्पादनाच्या समस्ये पासून, नंतरच्या प्रत्येक दशकात शेतीत बदल होत गेले. यांत्रिकीकरण, हरितक्रांती, धवलक्रांती, मत्स्य शेतीची नील क्रांती, फळे आणि फुलांची रेनबो क्रांती आणि जैव तंत्रज्ञानाची ओळख, हे टप्पे आहेत. सध्या शेतकरी शेतमालाला भाव मिळत नसल्याने चिंताक्रांत आहेत. जलप्रदूषण आणि रासायनिक खतांच्या अपरिमित वापरामुळे शेतमाल विषयुक्त होत आहे. त्यामुळे आरोग्य समस्या उद्भवू लागल्या आहेत. 
ग्राहकच आता सेंद्रीय पदार्थांची मागणी करताना दिसत आहेत. येत्या काळात या मागणीत वाढच होत जाणार आहे. येणारा काळ हा जैविक शेतीचा असेल. या शेतीमधे अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा देखील वापर होईल. खते, बियाणे याची मागणी ऑनलाईन होईल. उलट, अनेक कंपन्या शेतकऱ्यांना बांधावरच हव्या त्या वस्तू देतील. अभियांत्रिकी, वैद्यक आणि माहिती तंत्रज्ञान यांच्या वाढीला एक मर्यादा आहे. शिवाय प्रत्येक व्यक्ती हा डॉक्टर असला काय अथवा कामगार असला काय त्याला रोजचा आहार हवाच आहे. अर्थातच तो सकस आहारालाच प्राधान्य देईल. 
बदलत्या काळामधे तंत्रज्ञानाच्या वापरामुळे शेतीवरील मनुष्यबळ काहीसे कमी होईल. मात्र, इतर विभागांच्या तुलनेत ते काहीसे अधिक राहील. येत्या काळात शिक्षित तरुण देखील शेतीकडे वळतील. त्यात नवा बदल करु पाहतील. त्या जोडीला बाजार देखील आॅनलाईन झालेले असतील. शेतकऱ्यांना आपल्या मोबाईलवरच शेतीचे दर, मालाची उत्पादकता, देशी आणि आंतरराष्ट्रीय बाजारभाव याची माहिती मिळेल. शेतीमधे देखील माहिती आणि तंत्रज्ञान असेल. त्या आधारावर तयार होणाऱ्या नवीन क्षेत्रात अनेक कंपन्या गुंतवणूक करताना दिसतील. महत्त्वाचे म्हणजे शहरातील पाणी प्रक्रियाकडून नदीत सोडण्याला सरकार प्राधान्य देईल. थोडक्यात,शेतकºयांचे भविष्य उज्जवल असेल. 

Web Title: Organic farming will increase in the country: Budhajirao Mullick

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.