कोरेगाव बाजारने घेतला वृद्ध महिलेचा जीव
By admin | Published: May 20, 2017 05:03 AM2017-05-20T05:03:26+5:302017-05-20T05:03:26+5:30
पुणे-नगर महामार्गावर वाहतुकीस अडथळा ठरणाऱ्या कोरेगाव भीमा येथील आठवडे बाजारमुळे होणारी वाहतूक कोंडी सुटता सुटत नाही. आजपर्यंत प्रवाशांना वाहतूक कोंडीच्या
- लोकमत न्यूज नेटवर्क
कोरेगाव भीमा : पुणे-नगर महामार्गावर वाहतुकीस अडथळा ठरणाऱ्या कोरेगाव भीमा येथील आठवडे बाजारमुळे होणारी वाहतूक कोंडी सुटता सुटत नाही. आजपर्यंत प्रवाशांना वाहतूक कोंडीच्या त्रासाला सामोरे जावे लागत असताना आठवडे बाजारात शेतातील माल विकण्यासाठी आलेल्या वृध्द महिलेस रस्ता ओलांडत असताना बसची धडक बसल्याने महिला ठार झाली आहे.
कोरेगाव भीमा येथील आठवडे बाजारमुळे पुणे-नगर महामार्गावर मोठ्याप्रमाणावर वाहतूक कोंडी होत असते. बाजारमुळे होणारी वाहतुक कोंडी सोडविण्यासाठी गेल्या दीड वर्षांपासुन जिल्हाधिकारी सौरभ राव स्थानिक अधिकाऱ्यांच्या बैठका घेवून सतत बाजार स्थलांतरित करन्याबाबत आदेश देवूनही तहसीलदार, गटविकास अधिकारी, पोलीस निरिक्षक बाजारची पाहणी करण्यापलीकडे कोणतीच कार्यवाही करताना दिसत नसल्याने वाहतूक कोंडी सुटता नाही उलट वाहतूक कोंडीत वाढच होत आहे.
आठवडे बाजार दिवशी होणाऱ्या वाहतूक कोंडीमुळे अनेकवेळा रुग्नवाहिकेतून उपचारासाठी जाणाऱ्या रुग्नांच्या रुग्नवाहीकेंना रस्ता मिळत अनेकांना उपचाराअभावी आपला जिव गमवावा लागत आहे. त्यात भर म्हणून की काय वढु चौक व गणेश भुवन चौकामध्ये रस्ता बॅरीगेट व दोरी बांधुन बंद करण्यात येत असल्याने पादचाऱ्यांना रस्ता दुभाजकावरुन रस्ता ओलांडावा लागत असल्याने नागरिक, वृध्दांच्या अंगावर वाहने येण्याचेही प्रकार घडत असतात.
शिक्रापुर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तायकीशा इंजीनीअरींग इंडिया लीमीटेड या कारखान्याची कामगारांना घेवून जाणारी बस क्र. एम. एच. १२ एच. बी. १९९७ हि नगर बाजुकडुन पुन्याकडे जात ासताना कोरेगाव भीमा येथिल वाहतूक कोंडीत अडकली होती.
थोडा रस्ता मोकळा झाल्यानंतर बस जोरात चालली होती. त्याचवेळी अंजना गणपत भंडारे (वय ६५, रा. वढु बुद्रुक) ही वृध्द महिला शेतातील माल बाजारमध्ये विकून घरी जात असताना तायकीशा कारखान्याच्या बसची धडक बसल्याने महिला खाली पडली. महिला खाली पडल्यानंतर बसच्या बरोबर मध्ये आल्याने गंभीर जखमी झाली होती.
डोक्याला, छातीला जास्त मार लागला असल्याने वाघोली येथिल आयमॅक्स रुग्नालयात उपचारासाठी नेण्यात आले. मात्र उपचारा
दरम्यान महिलेचा मृत्यू झाला
असुन बसचा चालक फरार झाला आहे. तर पुढील तपास जगदाळे हे करित आहे.
पादचाऱ्यांना
मार्गिका तयार करा
आठवडे बाजार दिवशी वाहतूक कोंडी सोडविण्याचा स्वत:वरील ताण कमी करण्यासाठी वढू चौक व गणेश भुवन येथिल रस्ता बॅरिगेटने बंद करण्यात येत असल्याने पादचाऱ्यांना रस्ता दुभाजकावरुन रस्ता ओलांडावा लागत असल्याने वृध्द महिलेला जीव गमवावा लागला आहे. यातुन बोध घेत शिक्रापुर पोलीसांनी पादचाऱ्यांना रस्ता ओलांडण्यासाठी मार्गिका तयार करण्याची मागणी ग्रामस्थ करित आहे.