पुरंदरमधील संघटना आंदोलनावर ठाम
By admin | Published: November 18, 2016 05:47 AM2016-11-18T05:47:32+5:302016-11-18T05:47:32+5:30
पुरंदर तालुक्यातील ८८ ग्रामपंचायतीच्या कपाटाच्या चाव्या आणि शिक्के पुरंदर तालुका गटविकास अधिकारी सुवर्णा चव्हाण यांच्याकडे सुपूर्त
नारायणपूर : पुरंदर तालुक्यातील ८८ ग्रामपंचायतीच्या कपाटाच्या चाव्या आणि शिक्के पुरंदर तालुका गटविकास अधिकारी सुवर्णा चव्हाण यांच्याकडे सुपूर्त केल्या. या वेळी सर्व ग्रामपंचायतीचे सर्व ग्रामसेवक आंदोलनावर ठाम होते.
महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियन डि.एन.ई १३६ ग्रामसेवक संवर्गातील न्याय व हक्काच्या मागणीसाठी ७ जानेवारी २०१६ पासून राज्यव्यापी असहकार व कामबंद आंदोलन करण्यात आले होते. याचा चौथ्या टप्या म्हणून हे आंदोलन करण्यात येत आहे. निवडणूक विषयक व आपत्कालीन कामे वगळून होणाऱ्या बेमुदत कामबंद आंदोलनात ग्रामपंचायतीच्या चाव्या
तालुका प्रशासनाकडे जमा करून असाच उत्स्फूर्त सहभाग नोंदवून आंदोलनाच्या शेवटच्या
क्षणापर्यंत राज्य युनियनचा
पुढील आदेश येईपर्यंत असेच आंदोलन सुरू ठेवण्यात येणार असल्याचे ग्रामसेवक संघटनेचे तालुकध्यक्ष संदीप ठवाळ यांनी सांगितले. (वार्ताहर)