रक्तदान शिबिराचे आयोजन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 23, 2020 04:08 AM2020-12-23T04:08:34+5:302020-12-23T04:08:34+5:30
पुणे : कोरोनामुळे शहरात रक्ताचा तुडवडा कमी पडू लागला आहे. त्यामुळे सखाराम रामचंद्र दिवेकर यांच्या आठव्या पुण्यतिथीनिमित्ताने प्रदीप ...
पुणे : कोरोनामुळे शहरात रक्ताचा तुडवडा कमी पडू लागला आहे. त्यामुळे सखाराम रामचंद्र दिवेकर यांच्या आठव्या पुण्यतिथीनिमित्ताने प्रदीप दिवेकर परिवाराच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन केले. एकूण ८७ रक्तदात्यांनी रक्तदान केले.
--
बाळासाहेब शिवरकर याचे गुरुवारी लाक्षणिक उपोषण
पुणे : केंद्र सरकारने केलेले तीन कृषी विषय कायदे रद्द करावेत. या मागणीसाठी दिल्लीत शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. पाठींबा देण्यासाठी माजी राज्यमंत्री व काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब शिवकर यांनी शेवाळवाडी भाजी मंडई येथे काँग्रेसच्या कार्यकर्त्यांसह एका दिवसाचे लाक्षणिक उपोषण गुरुवारी (दि.२४) रोजी करणार आहेत.
--
डॉ. मधुसूदन घाणेकर यांना जीवन गौरव पुरस्कार
पुणे : शॉर्ट फिल्म क्षेत्रासाठी सिल्व्हर स्क्रिन, दुबई या संस्थेने ऑनलाईन आंतरराष्ट्रीय जीवन गौरव पुरस्कार प्रदान केला. घाणेकर यांच्या नावावर नक्षत्र डॉट कॉम लघुपटासाठी विश्व विक्रम नोंदवला गेला आहे.
--
उपाध्यक्षपदी कैलास मोरे
पुणे : भारतीय जनता पार्टीच्या पर्वती विधानसभा मतदार संघाच्या उपाध्यक्षपदी निवड केली. नियुक्तीपत्र शहराध्यक्ष जगदीश मुळील यांच्या हस्ते दिले. यावेळी जितेंद्र पोळेकर, प्रशांत दिवेकर, विश्वास ननावरे, शैलेश देशपांडे, लहू जागडे उपस्थित होते.