बारामती तालुक्यातील सोनगावात बैलगाडा शर्यतीचे आयोजन; दोघांवर गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2021 08:06 PM2021-02-23T20:06:21+5:302021-02-23T20:07:03+5:30
सर्वोच्च न्यायालयाने बैलगाडा शर्यतीला बंदी घातली असताना आयोजन केले.
बारामती: सर्वोच्च न्यायालयाने बैलगाडा शर्यतीला बंदी घातलेली असताना सोनगाव (ता.बारामती) येथे बैलगाडा शर्यतीचे आयोजन केल्याचे उघड झाले आहे. याप्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात आयोजकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलीस कर्मचारी दत्तात्रय मदने यांनी याबाबत फिर्याद दिली आहे.त्यानुसार राहूल सुभाष सपकाळ व विजय बाबाजी देवकाते अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. त्यांच्याविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला. आहे.
मंगळवारी (दि. २३) सकाळी साडे अकरा वाजता सोनगावच्या हद्दीत सूळवस्ती येते ढेकळवाडी रस्त्यावर देवकाते यांच्या शेतात ही घटना घडली. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे संचारबंदी असताना आरोपींनी लोकांना एकत्र येत हयगयीची कृती केली. तसेच सर्वोच्च न्यायालयाने बैलगाडा शर्यतीला बंदी घातली असताना आयोजन केले. तेथे बैलगाडा मालक यांनी बैल घेवून येत ते पळवत बैलांना मारहाण करत प्राण्यांना निर्दयतेचे वागणूक दिल्याचे फिर्यादीत नमुद करण्यात आले आहे.
—————————————