‘महाराष्ट्र बनणार मंच’चे आज चिंचवडला आयोजन

By admin | Published: May 8, 2017 02:48 AM2017-05-08T02:48:16+5:302017-05-08T02:48:16+5:30

कलाकारांच्या कलेला प्रोत्साहन देण्यासाठी परत एकदा कलर्स प्रस्तुत लोकमत सखी मंच आयोजित ‘महाराष्ट्र बनेगा मंच’ हा नावीन्यपूर्ण

Organizing 'Chinchwad' of 'Maharashtra Bean Manch' today | ‘महाराष्ट्र बनणार मंच’चे आज चिंचवडला आयोजन

‘महाराष्ट्र बनणार मंच’चे आज चिंचवडला आयोजन

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
पिंपरी : कलाकारांच्या कलेला प्रोत्साहन देण्यासाठी परत एकदा कलर्स प्रस्तुत लोकमत सखी मंच आयोजित ‘महाराष्ट्र बनेगा मंच’ हा नावीन्यपूर्ण कार्यक्रम सदस्यांच्या भेटीला येत आहे. गोव्यासह महाराष्ट्रात महिलांच्या मनामनात राज्य करणारे लोकमत सखी मंच आणि लोकप्रिय चॅनल कलर्स परत एकदा सज्ज झाले आहे कलाकारांंना प्रोत्साहन देण्यासाठी. प्रत्येक व्यक्तीच्या अंगी काही ना काही कला असते. फक्त त्या कलेला एक मंच हवा असतो आणि हा मंच देण्याचा प्रयत्न कलर्स प्रस्तुत लोकमत सखी संच आयोजित ‘महाराष्ट्र बनेगा मंच’ या कार्यक्रमात होणार आहे.
या कार्यक्रमात वेगळेपण म्हणजे कुठल्याही परीक्षकाशिवाय ही स्पर्धा संपन्न होणार आहे. तुमच्या शहरातील जनता ठरविणार. विजेता तेही तुमच्या नजरेसमोर हा कार्यक्रम आज सोमवार, दि. ८ रोजी सायंकाळी ५ वा. प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह, चिंचवड येथे आयोजित केला असून यात तुम्हाला येत असलेल्या अशा कलेचे प्रदर्शन तुम्हाला करायचे आहे, जी कला तुम्ही मंचावर प्रस्तुत करू शकाल.
हाच कार्यक्रम महाराष्ट्रात कलर्स प्रस्तुत लोकमत सखी मंच आयोजित आता महाराष्ट्र बनणार मंच, ज्यात सोलो, ड्युएट किंवा ग्रुप नृत्य, अभिनय, मिमिक्री, पेंटिंग,
वादन, जादूचे प्रयोग, जिमनॅस्टिक, आॅक्रेस्ट्रा, कवायत, योगासने, कठपुतली, मेकअप आर्ट, कीर्तन, भजन, भारूड, खंजिरी वादन, ढोल पथक इत्यादी व यासारखे कलाप्रकार सादर करता येईल. सादर करण्यासाठी लागणारे साहित्य स्पर्धकांनी स्वत: आणावे. तेव्हा भाग घ्या आणि जिंका भरपूर बक्षिसे.
कलर्स चॅनलने आपल्या चोखंदळ प्रेक्षकांसाठी एका नाविन्यपूर्ण शो चे आयोजन केले आहे. ‘इंडिया बनेगा मंच’ या नावातच याचे वेगळेपण दडले आहे. एका टॅलेंट शो ला अशा पद्धतीने सादर करणे म्हणजे सर्व कलाकारांना आपल्या प्रतिभेला जनतेसमोर आणण्याचे प्रोत्साहन देणे होय. हा कार्यक्रम कलर्स चॅनलवर ७ मे पासून प्रत्येक शनिवारी व रविवारी रात्री ९ वाजता प्रक्षेपित होणार आहे.
या अंतर्गत भारतातील प्रमुख शहरांमध्ये नावाजलेल्या जागांवर, चौकांमध्ये किंवा मॉलमध्ये या कार्यक्रमाअंतर्गत कलाकार सामील होऊ शकतील आणि आपल्या प्रतिभेला पंख देतील. कुठल्याही परीक्षकांशिवाय कोलकाताचा हावडा ब्रिज, दिल्लीचा लाल किल्ला, इंडिया गेट, मुंबईची जुहू चौपाटी अशा सुविख्यात नावाजलेल्या जागी कलाकारांचा कलाविष्कार आणि भारतीय जनतेचा कौल अशा पद्धतीने हा कार्यक्रम चॅनलवर रंगणार आहे.

आपल्या शहरात सोमवारी (दि. ८) या दिवशी ‘महाराष्ट्र बनणार मंच’ होत आहे. यामध्ये भाग घेऊन जिंका आकर्षक पुरस्कार. अधिक माहितीसाठी व नावनोंदणीसाठी ०२०-६७३४५६७८ या क्रमांकावर संपर्क करा. ही स्पर्धा पाहण्यासाठी सखी मंच सदस्यांना आग्रहाचे निमंत्रण देण्यात येत आहे.

Web Title: Organizing 'Chinchwad' of 'Maharashtra Bean Manch' today

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.