जिल्हा टेनिस, व्हॉलीबॉल क्रीडा स्पर्धांचे आयोजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2021 04:09 AM2021-07-18T04:09:08+5:302021-07-18T04:09:08+5:30

कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी खंडेराय प्रतिष्ठान अध्यक्ष गणपतराव बालवडकर तर प्रमुख पाहुणे भगवान पेद्दवाड, टेनिस व्हॉलीबॉल फेडरेशन ऑफ इंडियाचे अध्यक्ष आनंद ...

Organizing district tennis, volleyball sports competitions | जिल्हा टेनिस, व्हॉलीबॉल क्रीडा स्पर्धांचे आयोजन

जिल्हा टेनिस, व्हॉलीबॉल क्रीडा स्पर्धांचे आयोजन

Next

कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी खंडेराय प्रतिष्ठान अध्यक्ष गणपतराव बालवडकर तर प्रमुख पाहुणे भगवान पेद्दवाड, टेनिस व्हॉलीबॉल फेडरेशन ऑफ इंडियाचे अध्यक्ष आनंद खरे, सरचिटणीस डॉ. रितेश वांगवाड, कोषाध्यक्ष धर्मसिंग जडेजा,डॉ. पी.लक्ष्मी प्रसन्न , क्रीडा उपसंचालक जनक टेकाळे, राज्य अध्यक्ष सुरेशरेड्डी ,राज्य सचिव गणेश माळवे, राज्य कोषाध्यक्ष दिनेश शिगारम, राज्य सहसचिव किशोर चौधरी, प्रा. रणजित चामले, पुणे जिल्हा अध्यक्ष सागर बालवडकर, जिल्हा सचिव फिरोज शेख, निवृत्ती काळभोर,आदी उपस्थित होते.

याप्रंसगी टेनिस व्हॉलीबॉल खेळाचे जनक डॉ. व्यंकटेश वांगवाड यांनी पुणे शहरातून टेनिस व्हॉलीबॉल खेळाचा निर्माण करून देशाला एक भारतीय खेळाची निर्मिती केल्या बदल मान्यवरांच्या हस्ते पुणेरी पगडी, सन्मानचिन्ह, शाल देऊन गौरविण्यात आले.

टेनिस, व्हॉलीबॉल खेळाचा इतिहास व नियमावलीचे हस्तपुस्तिका लेखक गणेश माळवे यांनी लिहिलेल्या पुस्तिकेचे विमोचन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. सूत्रसंचलन महादेव फपाळ यांनी केले तर आभार सुजाता चव्हाण यांनी मानले.

कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी प्रफुल्लकुमार बन्सोड, सुदाम लाड, किरण घोलप, नीलेश माळवे, आकाश महाले आदींनी प्रयत्न केले.

जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेत पुरुष व महिलांचे एकूण २० संघ सहभागी झाले होते. स्पर्धेचा निकाल पुढीलप्रमाणे:

पुरुष गट

विजयी संघ -मावळ तालुका

उपविजयी संघ: पिंपरी चिंचवड

महिला गट:

विजयी संघ- पिंपरी चिंचवड

उपविजयी संघ: पुणे सिटी

Web Title: Organizing district tennis, volleyball sports competitions

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.