पुणे बनणार मंचचे आज आयोजन
By admin | Published: May 5, 2017 03:02 AM2017-05-05T03:02:06+5:302017-05-05T03:02:06+5:30
कलाकारांच्या कलेला प्रोत्साहन देण्यासाठी पुन्हा एकदा कलर्स प्रस्तुत लोकमत सखी मंच आयोजित ‘पुणे बनेगा मंच’ हा नावीन्यपूर्ण
पुणे : कलाकारांच्या कलेला प्रोत्साहन देण्यासाठी पुन्हा एकदा कलर्स प्रस्तुत लोकमत सखी मंच आयोजित ‘पुणे बनेगा मंच’ हा नावीन्यपूर्ण कार्यक्रम सदस्यांच्या भेटीला येत आहे. गोव्यासह महाराष्ट्रात महिलांच्या मनामनात राज्य करणारे लोकमत सखी मंच आणि लोकप्रिय चॅनल कलर्स परत एकदा सज्ज झाले आहे.
प्रत्येक व्यक्तीच्या अंगी काही ना काही कला असते. फक्त त्या कलेला एक मंच हवा असतो. हा मंच देण्याचा प्रयत्न कलर्स प्रस्तुत लोकमत सखी संच आयोजित ‘पुणे बनेगा मंच’ या कार्यक्रमात होणार आहे. कुठल्याही परीक्षकाशिवाय ही स्पर्धा होणार आहे. तुमच्या शहरातील जनता ठरविणार. विजेताही तुमच्या नजरेसमोर हा कार्यक्रम शुक्रवारी (दि. ५) सायंकाळी ५.३० वाजता कन्यादान मंगल कार्यालय, हडपसर येथे आयोजित केला असून यात तुम्हाला येत असलेल्या अशा कलेचे प्रदर्शन तुम्हाला करायचे आहे, जी कला तुम्ही मंचावर प्रस्तुत करू शकाल.
हाच कार्यक्रम आता राज्य पातळीवर ‘महाराष्ट्र बनणार मंच’ नावाने होणार आहे. यामध्ये सोलो, ड्युएट किंवा ग्रुप नृत्य, अभिनय, मिमिक्री, पेंटिंग, वादन, जादूचे प्रयोग, जिम्नॅस्टिक, आॅर्केस्ट्रा, कवायत, योगासने, कठपुतली, मेकअप आर्ट, कीर्तन, भजन, भारुड, खंजिरीवादन, ढोल पथक आदी व यांसारखे कलाप्रकार सादर करता येतील. सादर करण्यासाठी लागणारे साहित्य स्पर्धकांनी स्वत: आणावे. तेव्हा भाग घ्या आणि जिंका भरपूर बक्षिसे.
कलर्स चॅनलने आपल्या चोखंदळ प्रेक्षकांसाठी एका नावीन्यपूर्ण शोचे आयोजन केले आहे. ‘इंडिया बनेगा मंच’ या नावातच याचे वेगळेपण दडले आहे. हा कार्यक्रम कलर्स चॅनलवर ७ मेपासून प्रत्येक शनिवारी व रविवारी रात्री ९ वाजता प्रक्षेपित होणार
आहे.
याअंतर्गत भारतातील प्रमुख शहरांमध्ये नावाजलेल्या जागांवर, चौकांमध्ये किंवा मॉलमध्ये या कार्यक्रमांतर्गत कलाकार सामील होऊ शकतील आणि आपल्या प्रतिभेला पंख देतील. कुठल्याही परीक्षकांशिवाय कोलकाताचा हावडा ब्रिज, दिल्लीचा लाल किल्ला, इंडिया गेट, मुंबईची जुहू चौपाटी अशा सुविख्यात नावाजलेल्या जागी कलाकारांचा कलाविष्कार आणि भारतीय जनतेचा कौल अशा पद्धतीने हा कार्यक्रम चॅनलवर रंगणार आहे. (प्रतिनिधी)
आपल्या शहरात शुक्रवारी (दि. ५) या दिवशी ‘पुणे बनणार मंच’ होत आहे. यामध्ये भाग घेऊन जिंका आकर्षक पुरस्कार. अधिक माहिती व नावनोंदणीसाठी ०२०- ६६८४८५८६ या क्रमांकावर सकाळी ११ ते ५ संपर्क करा. ही स्पर्धा पाहण्यासाठी सखी मंच सदस्यांना आग्रहाचे निमंत्रण देण्यात येत आहे.