मुळशी तालुक्यामध्ये ‘शासन आपल्या दारी’ कार्यक्रमाचे आयोजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2021 04:12 AM2021-02-27T04:12:18+5:302021-02-27T04:12:18+5:30

आरोग्य तपासणी शिबिराचेही आयोजन पिरंगुट : मुळशी तालुक्यातील नागरिकांचे असलेले अनेक प्रश्न मार्गी लावण्यासाठी मुळशी तालुक्यातील महसूल प्रशासन-युवासेना-शिवसेना यांच्या ...

Organizing 'Government at Your Doorstep' program in Mulshi taluka | मुळशी तालुक्यामध्ये ‘शासन आपल्या दारी’ कार्यक्रमाचे आयोजन

मुळशी तालुक्यामध्ये ‘शासन आपल्या दारी’ कार्यक्रमाचे आयोजन

Next

आरोग्य तपासणी शिबिराचेही आयोजन

पिरंगुट : मुळशी तालुक्यातील नागरिकांचे असलेले अनेक प्रश्न मार्गी लावण्यासाठी मुळशी तालुक्यातील महसूल प्रशासन-युवासेना-शिवसेना यांच्या वतीने शासन आपल्या दारी, ठाकरे सरकार घरोघरी व भव्य आरोग्य तपासणी शिबिराचे मुळशी तालुक्यामध्ये आयोजन करण्यात आले होते.

या कार्यक्रमाचे आयोजन हे युवा सेना जिल्हाप्रमुख अविनाश बलकवडे यांनी केले होते. कार्यक्रमाचे उद्घाटन हे मावळ, मुळशीचे प्रांत अधिकारी संदेश शिर्के, शिवसेना जिल्हाप्रमुख रमेश कोंडे, मुळशीचे तहसीलदार अभय चव्हाण, सहसंपर्क प्रमुख कुलदीप कोंडे, बाळासाहेब चांदेरे, म्हाडाच्या संचालिका स्वाती ढमाले, महिला आघाडी पुणे जिल्हा संघटिका संगीता पवळे यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आले. याप्रसंगी विधान परिषद उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी मुंबईतून व्हिडिओ कॉन्फरन्सनद्वारे उपस्थितांना मार्गदर्शन केले. तसेच विविध विकासकामांसाठी अकरा लाख रूपये व एक रूग्णवाहिका विकासनिधीतून देणार असल्याचे देखील जाहीर केले.

तर या कार्यक्रमाचा समारोप माजी आमदार शरद ढमाले, जिल्हा परिषद सदस्य शंकर मांडेकर, सागर काटकर, उपसभापती विजय केदारी, गटविकास अधिकारी संदीप जठार, आरोग्य अधिकारी अजित करंजकर, राम गायकवाड, सचिन खैरे, प्रकाश भेगडे, रविकांत धुमाळ,संतोष तोंडे,ज्योती चांदेरे,राम गायकवाड, ज्ञानेश्वर डफळ यांच्या हस्ते विविध दाखले वाटप करून करण्यात आला.त्यावेळी नामदेव टेमघरेे,हनुमंत सुर्वे,दिलीप गुरव,अनिल अधवडे,गणपत वाशिवले,मोहन शिंदे,धनंजय टेमघरे,गोविंद सरुसे,सचिन पळसकर,अनंता वाशिवले,शिवाजी बलकवडे,नरेश भरम,पांडुरंग निवेकर,सुनील वाईकर,विश्वनाथ वीर,सुरेश शिंदे,लहू लायगुडे,शंकर जांभुळकर,किसन सोनार,एकनाथ तिडके हे पदाधिकारी व मान्यवर उपस्थित होते. सूत्रसंचालन हनुमंत सुर्वे यांनी केले तर आभार गोविंद सरोसे यांनी मानले.

या कार्यक्रमादरम्यान आरोग्य शिबिराचे देखील आयोजन करण्यात आले होते. शिबिराचा जवळपास चारशे ते पाचशे नागरिकांनी लाभ घेतला. माले येथे झालेल्या शासन आपल्या दारी, ठाकरे सरकार घरोघरी या उपक्रमांमुळे अनेक प्रलंबित प्रकरणे मार्गी लागली असून, राहिलेली प्रकरणे पुढील पंधरा दिवसांत मार्गी लागणार असल्याची माहिती युवासेना जिल्हाप्रमुख अविनाश बलकवडे यांनी या वेळी दिली.

शासन आपल्या दारी, ठाकरे सरकार घरोघरी कार्यक्रमांतर्गत दाखले वाटप करताना प्रांतधिकारी संदेश शिर्के, अविनाश बलकवडे व इतर मान्यवर.

Web Title: Organizing 'Government at Your Doorstep' program in Mulshi taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.