कुंजीरवाडी येथे आरोग्य शिबिराचे आयोजन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 25, 2021 04:11 AM2021-03-25T04:11:50+5:302021-03-25T04:11:50+5:30
आरोग्य शिबिरामध्ये साधू वासवाणी कॉलेज ऑफ नर्सिंग महाविद्यातील राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांनी मधुमेह, उच्च रक्तदाब, कर्करोग आणि कोरोनाचा वाढता ...
आरोग्य शिबिरामध्ये साधू वासवाणी कॉलेज ऑफ नर्सिंग महाविद्यातील राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांनी मधुमेह, उच्च रक्तदाब, कर्करोग आणि कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव या विषयांवर पथनाट्य सादर करून जनजागृती केली.
आजार कसे होतात, त्यापासून बचाव कसा केला पाहिजे. त्याबाबत कोणत्या उपाययोजना केल्या पाहिजेत हे विद्यार्थ्यांनी नागरिकांना समजावून सांगितले. शिबिरासाठी विद्यार्थ्यांना सहयोगी प्र. नमिता पाठक व रूपाली शिंदे यांनी मार्गदर्शन केले. यावेळी विद्यार्थ्यांनी आरोग्यविषयक रॅली काढून समाज प्रबोधनही केले. या शिबिराला सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य ग्रामविकास अधिकारी व ग्रामपंचायत कर्मचारी यांचे सहकार्य मिळाले.
--
फोटो ओळ : कुंजीरवाडी (ता. हवेली) येथे पथनाट्याद्वारे जनजागृती करताना राष्ट्रीय सेवा योजनेचे विद्यार्थी.
फोटो क्रमांक : २४ पुणे-कुंजीरवाडी आरोग्य शिबिर