टिमवितर्फे आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 19, 2021 04:10 AM2021-04-19T04:10:57+5:302021-04-19T04:10:57+5:30
लोकमान्य टिळक यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ टिळक महाराष्ट्र विद्यापीठाची स्थापना केली असून टिमवि शताब्दी साजरी करत आहे. या शताब्दी महोत्सवाअंतर्गत विविध ...
लोकमान्य टिळक यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ टिळक महाराष्ट्र विद्यापीठाची स्थापना केली असून टिमवि शताब्दी साजरी करत आहे. या शताब्दी महोत्सवाअंतर्गत विविध कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. त्याचाच एक भाग म्हणून महत्त्वाच्या विषयावरील आंतरराष्ट्रीय परिषद आयोजित केली आहे. कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे सध्या ऑनलाइन शिक्षण सुरू आहे. या परिषेदत शिक्षणातील अनुभवात्मक माहिती देण्यात येईल. तसेच शिक्षण क्षेत्रात जागतिक स्तरावर होणारे बदल आणि ‘भारताचे शैक्षणिक धोरण’या विषयांचा मागोवा या परिषदेत घेतला जाणार आहे, अशी माहिती विद्यापीठाच्या प्रभारी कुलगुरू डॉ. गीताली टिळक यांनी दिली.
प्रचलित शिक्षण पद्धतीची रचना, अध्यापन शास्त्र आणि जागतिक स्तरावरील या क्षेत्रातील अनुभव याबाबत सुद्धा या परिषदेत मार्गदर्शन केले जाणार आहे. अॅड. एस. के. जैन, ज्युलियन वॉरिकर, डॉ. शुभ्रा दत्ता, डॉ. उषा उकांडे, डॉ. स्कॉट क्लॉटियर, डॉ. एन. जयशंकरन, प्रा. मायकेल केपेल, प्रा. मोहन दत्ता, डॉ. सायली गणकर, डॉ. एन. श्रीकांत आदी तज्ञ या परिषदेत सहभागी होणार आहे.