जैन महिला व्यावसायिकांसाठी ‘जीतो एक्स्पो २०२१’चे आयोजन - 17 व 18 ऑक्टोबर रोजी पुण्यात प्रदर्शन होणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2021 04:12 AM2021-09-19T04:12:43+5:302021-09-19T04:12:43+5:30
जैन समाजाची आर्थिक, शिक्षण आणि सेवा क्षेत्रातील प्रगती या उदात्त हेतूने ‘जीतो लेडीज विंग पुणे’च्या वतीने हे प्रदर्शन होत ...
जैन समाजाची आर्थिक, शिक्षण आणि सेवा क्षेत्रातील प्रगती या उदात्त हेतूने ‘जीतो लेडीज विंग पुणे’च्या वतीने हे प्रदर्शन होत आहे. प्रदर्शनातील विजेते व उपविजेत्यांना प्रमुख मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात येणार आहे. या प्रदर्शनासाठी रांका ज्वेलर्सतर्फे सहकार्य करण्यात आले असून, स्टार्टअपसाठी बी.जे. भंडारी ग्रुपकडून सहकार्य करण्यात आले आहे, अशी माहिती जीतो पुणे लेडीज विंगच्या अध्यक्षा खुशाली चोरडिया यांनी दिली. खालील लिंकवर रजिस्टर करावे. https://forms.gle/fxRLsN7Bt7wBtvr68.
जीतो ही आंतरराष्ट्रीय संघटना असून, जैन समाजातील उद्योजकता, शैक्षणिक व सामाजिक विकासासाठी ही संघटना काम करते. जीतो संघटनेचे भारतात सध्या ९ झोन असून, ६७ चॅप्टर व ११ आंतरराष्ट्रीय चॅप्टर व ३५ युनिटस् आहेत. भारताबाहेर अमेरिका, इंग्लंड, दक्षिण आफ्रिका, दुबई, हाँगकाँग इत्यादी देशांतही जीतो संघटना विस्तारित झाली आहे.