जिल्हा शिक्षण मंडळाकडून व्याख्यानमालेचे आयोजन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2021 04:09 AM2021-07-21T04:09:25+5:302021-07-21T04:09:25+5:30
पुणे : पुणे जिल्हा शिक्षण मंडळाकडून २२ ते २५ जुलैदरम्यान आॅनलाईन वेबिनार व अनंत व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले आहे. ...
पुणे : पुणे जिल्हा शिक्षण मंडळाकडून २२ ते २५ जुलैदरम्यान आॅनलाईन वेबिनार व अनंत व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा वाढदिवस आणि संस्थेच्या महाविद्यालय व शाळांच्या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त मंडळाकडून दरवर्षी या कालावधीत पुणे ते बारामती राष्ट्रीय सायकल स्पर्धेचे आयोजन करण्यात येते. मात्र, कोरोनामुळे यंदा ही स्पर्धा होणार नाही. त्यामुळे संस्थेने या शैक्षणिक वर्षात विद्यार्थी, विद्यार्थिनींच्या कलागुणांना वाव देण्यासाठी विविध उपक्रम आयोजित केले आहेत. व्याख्यानमालेत सामाजिक, शैक्षणिक, पर्यावरण, आर्थिक, आरोग्य, क्रीडा, करिअर या विषयांवर तज्ज्ञांची व्याख्याने होणार आहेत. तसेच, निबंध, चित्रकला, काव्यलेखन, वक्तृत्व, रांगोळी, गायन, वादन, अभिनय ईत्यादी कार्यक्रम होणार आहेत. या व्याख्यानमालेचे आँनलाईन उद्घाटन गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्याहस्ते गुरुवारी २२ जुलैला करण्यात येणार आहे. ग्लोबल टिचर अँवाँर्ड विजेते रणजितसिंह डिसले, खासदार डाँ. नरेंद्र जाधव, ईतिहास संशोधक गणेश शिंदे यांची व्याख्याने होणार आहेत.