भोरमध्ये अंधश्रद्धा निर्मूलन विचार संमेलनाचे आयोजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2021 04:14 AM2021-08-18T04:14:25+5:302021-08-18T04:14:25+5:30

अनंतराव थोपटे महाविद्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत वरील माहिती आयोजकांनी दिली. यावेळी डाॅ. अरुण बुरांडे, डाॅ. रोहिदास जाधव, सुरेश शहा, ...

Organizing a meeting to eradicate superstition in the morning | भोरमध्ये अंधश्रद्धा निर्मूलन विचार संमेलनाचे आयोजन

भोरमध्ये अंधश्रद्धा निर्मूलन विचार संमेलनाचे आयोजन

Next

अनंतराव थोपटे महाविद्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत वरील माहिती आयोजकांनी दिली. यावेळी डाॅ. अरुण बुरांडे, डाॅ. रोहिदास जाधव, सुरेश शहा, सविता कोठावळे, डॉ. लक्ष्मण अवघडे उपस्थित होते. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती आयोजित डॉ. नरेंद्र दाभोलकर विचार जागर सप्ताह दि.१४ ते २० ऑगस्टपर्यंत असून गुरुवारी (दि.१९) सकाळी ११ ते दुपारी ४ वाजेपर्यंत डॉ. नरेंद्र दाभोलकर विचार संमेलन आयोजित करण्यात आले आहे. या संमेलनाचे उद्घाटन डॉ. शैला दाभोलकर तर अध्यक्ष डॉ. दत्तप्रसाद दाभोलकर यांच्या हस्ते करण्यात आले आहे. यावेळी साधना मासिकाचे संपादक विनोद शिरसाठ, मुस्लिम सत्यशोधक मंडळाचे अध्यक्ष प्रा. शमसुद्दीन तांबोळी, अंनिसचे कार्यकर्ते डॅनियल मस्करणीस उपस्थित राहणार आहेत. संमेलनाच्या स्वागताक्षपदी राजगड ज्ञानपीठाच्या सचिव डाॅ. भाग्यश्री पाटील आहेत. यावेळी संमेलनावर आधारित स्मरणिकेचे प्रकाशन आमदार संग्राम थोपटे यांच्या हस्ते होणार आहे.

Web Title: Organizing a meeting to eradicate superstition in the morning

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.