‘संगीत संगोष्टी’ कार्यक्रमाचे आयोजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2021 04:20 AM2021-03-04T04:20:18+5:302021-03-04T04:20:18+5:30

पुणे : स्वरमंडल फाऊंडेशन’ व भारत सरकार सांस्कृतिक मंत्रालयाच्या नागपूर येथील दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्र यांच्या वतीने उत्तर ...

Organizing ‘Music Seminars’ | ‘संगीत संगोष्टी’ कार्यक्रमाचे आयोजन

‘संगीत संगोष्टी’ कार्यक्रमाचे आयोजन

Next

पुणे : स्वरमंडल फाऊंडेशन’ व भारत सरकार सांस्कृतिक मंत्रालयाच्या नागपूर येथील दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्र यांच्या वतीने उत्तर भारतीय व दक्षिण भारतीय शास्त्रीय संगीतावर आधारित ‘संगीत संगोष्टी’ कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. शनिवार,(दि. ६) रविवार दि. ७ मार्च रोजी कर्वे रस्त्यावरील गरवारे महाविद्यालयाच्या सभागृहात हा कार्यक्रम होणार आहे.

कार्यक्रमाचे उद्घाटन ६ मार्च रोजी सायंकाळी ६ वाजता होणार असून, त्यानंतर ज्येष्ठ गायक स्व. पं. चिंतुबुवा म्हैसकर व स्व. पं. रत्नाकर पै यांच्या शिष्या जयपूर घराण्याच्या ज्येष्ठ गायिका शाल्मली जोशी यांचे गायन होणार आहे. या वेळी जोशी यांच्याशी पायगुडे संवाद साधणार आहेत.

रविवारी (दि. ७) सायंकाळी ५ वाजता शास्त्रीय गायक आदित्य खांडवे यांचे गायन होणार असून, त्यांना अजिंक्य जोशी (तबला), सुयोग कुंडलकर (हार्मोनियम) हे साथसंगत करणार आहेत. त्यानंतर पं. अनंत तेरदल हे कन्नड रचना पेश करतील. यावेळी पं. अनंत तेरदल यांच्याशी डॉ. कस्तुरी पायगुडे-राणे संवाद साधतील. या दोन दिवसीय कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आनंद देशमुख करणार आहेत.

Web Title: Organizing ‘Music Seminars’

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.