थोपटे विद्यालयात राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 10, 2021 04:10 AM2021-02-10T04:10:15+5:302021-02-10T04:10:15+5:30
नवीन शैक्षणिक धोरणाचे फायदे तोटे आणि त्यातून निर्माण होणारी सामाजिक अस्वस्थता यावर प्रकाश पडावा आणि खऱ्या बाबी समाजापुढे याव्यात, ...
नवीन शैक्षणिक धोरणाचे फायदे तोटे आणि त्यातून निर्माण होणारी सामाजिक अस्वस्थता यावर प्रकाश पडावा आणि
खऱ्या बाबी समाजापुढे याव्यात, हा या चर्चासत्राचा उद्देश आहे. विद्यापीठ अनुदान आयोगाचे माजी अध्यक्ष (नवी दिल्ली) व ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ पद्मश्री डाॅ. सुखदेव थोरात हे बीजभाषक असून, उद्घाटक व अध्यक्ष डाॅ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ (औरंगाबाद)चे माजी कुलगुरू डाॅ.नागनाथ कोत्तापल्ले हे आहेत.
रयत शिक्षण संस्थेच्या सहसचिव डाॅ. प्रतिभा गायकवाड या प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित राहणार आहेत. राजगड ज्ञानपीठच्या सचिव डाॅ. भाग्यश्री पाटील यांची विशेष उपस्थिती राहील.
राष्ट्रीय शैक्षणिक धोरण आमच्या दृष्टिकोनातून या विषयावर दुपारच्या सत्रात चर्चासत्र होत असून, जयसिंगपूर महाविद्यालयाचे प्राचार्य डाॅ. राजेंद्र कुंभार हे अध्यक्ष आहेत. यात शिक्षक संघटनेचे प्रतिनिधी म्हणून शिक्षक हितकारणी संघटनेचे अध्यक्ष प्रा. प्रकाश पवार, शिक्षक प्रतिनिधी म्हणून गरवारे महाविद्यालय पुणे येथील डाॅ. सुलभा पाटोळे आणि विद्यार्थी प्रतिनिथी म्हणून विद्यार्थी कृती समितीचा मुकुल निकाळजे (औरंगाबाद) हे सहभागी होतील. कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे (जळगाव) माजी कुलगुरू डाॅ. आर. एस. माळी यांच्या अध्यक्षतेखाली समारोप होईल. यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या संरक्षणशास्र विभागाचे प्रमुख डाॅ. विजय खरे हे आहेत. या समारोपाच्या सत्रात ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ डाॅ. शरद जावडेकर आपले मनोगत व्यक्त करतील.