पेपर बॅग मेकिंग स्पर्धेचे आयोजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 15, 2021 04:08 AM2021-07-15T04:08:25+5:302021-07-15T04:08:25+5:30

१२ जुलै हा पेपर बॅग डेनिमित्त लिओ क्लब ऑफ जुन्नर शिवनेरीच्या वतीने पेपर बॅग मेकिंग स्पर्धेचे आयोजन करण्यात आले ...

Organizing paper bag making competition | पेपर बॅग मेकिंग स्पर्धेचे आयोजन

पेपर बॅग मेकिंग स्पर्धेचे आयोजन

Next

१२ जुलै हा पेपर बॅग डेनिमित्त लिओ क्लब ऑफ जुन्नर शिवनेरीच्या वतीने पेपर बॅग मेकिंग स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी प्लॅस्टिकच्या भरमसाठ वापरामुळे पर्यावरणावर दुष्परिणाम याविषयी डॉ. धनश्री जितेंद्र गुंजाळ यांनी मार्गदर्शन केले.

पेपर बॅग डेनिमित्त लिओ क्लब ऑफ जुन्नर शिवनेरीच्या वतीने पेपर बॅग मेकिंग स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत विविध शाळांमधील सुमारे १२०० विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून अंजली गुंजाळ व नंदा शिंदे यांनी काम पाहिले. या स्पर्धेसाठी आयोजित करण्यासाठी डिस्ट्रिक्ट लिओ क्लब ॲडवायझर लायन संदीप मुथ्था यांनी मार्गदर्शन केले. लिओ क्लबच्या सचिव लिओ श्वेता शिंदे व खजिनदार लिओ डॉ. प्रिया जठार यांनी विशेष योगदान दिले.

पेपर बॅग डेच्या निमित्ताने आयोजित लिओ क्लब ऑफ जुन्नर शिवनेरीच्या वतीने पेपर बॅग मेकिंग स्पर्धेतील विजेते.

Web Title: Organizing paper bag making competition

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.