वृक्षारोपण, रोपांचे वाटप, जनजागृती रॅलीचे आयोजन

By admin | Published: June 6, 2016 12:48 AM2016-06-06T00:48:03+5:302016-06-06T00:48:03+5:30

जागतिक पर्यावरणदिनानिमित्त शहरात राजकीय व सामाजिक संस्थांच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते

Organizing plantation, distribution of seedlings, public awareness rally | वृक्षारोपण, रोपांचे वाटप, जनजागृती रॅलीचे आयोजन

वृक्षारोपण, रोपांचे वाटप, जनजागृती रॅलीचे आयोजन

Next

पुणे : जागतिक पर्यावरणदिनानिमित्त शहरात राजकीय व सामाजिक संस्थांच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
पर्यावरण दिनानिमित्त भारतीय जनता पार्टी अल्पसंख्याक मोर्चा व स्थानिक नागरिक यांच्या संयुक्त विद्यमाने आनंदवन कोंढवा येथे प्लॅस्टिकमुक्त परिसर अभियान राबविण्यात आले. परिसारातील प्लॅस्टिक बाटल्या, कॅरीबॅग, दुधाच्या पिशव्या व अन्य प्लॅस्टिक कचरा गोळा करण्यात आला. या वेळी नागरिकांना प्लॅस्टिकचा वापर कमी करावा, असे आवाहन करण्यात आले. याप्रसंगी इसाक पानसरे, हुजूरभाई इनामदार, अभिजित पोमण, सुवर्णा पोमण, मुबारक शेख इ. मान्यवर उपस्थित होते.
पर्यावरण दिनाचे औचित्य साधून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने रोप आपल्या दारी या उपक्र माचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमाअंतर्गत मागेल त्याला रोप त्याच्या दारी देण्यात येणार आहे. ५ जून ते १५ आॅगस्ट या कालावधीत हा उपक्रम राबवण्यात येणार आहे. त्याचबरोबर मनसे गटनेत्यांमार्फत प्रत्येक नगरसेवकाला प्रभागात वृक्षारोपणाचे कार्यक्रम देण्यात आले आहेत.
राष्ट्रवादी युवक काँग्रेस व वैभव पंचमुख मित्र परिवार यांच्या संयुक्त विद्यमाने, पर्यावरण दिनानिमित्त खराडी-चंदननगर परिसरातील नागरिकांना घरोघरी विविध जातींच्या रोपांचे वाटप करण्यात आले, तसेच विविध ठिकाणी वृक्षारोपण करून त्या वृक्षांचे संवर्धन करण्याची शपथ या वेळी नागरिक व कार्यकर्त्यांनी घेतली.
या वेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहर उपाध्यक्ष वैभव पंचमुख, संतोष व्हालकर, अमोल पवार, लकी वसवे, शशी कांबळे, योगेश चौधरी, नाना धुमाळ, फिरोज खान, सुयोग कर्डिले, दादा धुमाळ इ. पदाधिकारी व नागरिक उपस्थित होते.
वृक्षारोपण करताना त्या भागात जे वृक्ष टिकतील, वाढतील असेच स्थानानुरुप वृक्षारोपण करणे गरजेचे असल्याचे मत खासदार अनिल शिरोळे यांनी पर्यावरण दिनानिमित्त शनिवार पेठेत आयोजित वृक्षारोपण कार्यक्रमात व्यक्त केले. या कार्यक्रमाला नगरसेविका मुक्ता टिळक, नगरसेवक दिलीप काळोखे, सचिन सप्रे, रवी मावडीकर व स्थानिक नागरिक उपस्थित होते.
जागतिक पर्यावरण दिनानिमित्त पुणे शहर महिला काँगे्रसच्या वतीने मुठा नदीचे जलपूजन व नदी स्वच्छता कार्यक्रम आयोजिण्यात आला होता. शहर महिला काँगे्रसच्या अध्यक्षा मंदाताई चव्हाण व अखिल भारतीय महिला काँगे्रसच्या सरचिटणीस कमल व्यवहारे यांच्या हस्ते मुठा नदीचे हळदी-कुंकू व फुले वाहून जलपूजन करण्यात आले. तसेच नदीपात्राची स्वच्छता करण्यात आली. सर्व महिलांनी पर्यावरण संतुलन राखण्यासाठी स्वच्छतेची शपथसुद्धा या वेळी घेतली.
जागतिक पर्यावरण दिनानिमित्त पुणे शहर जिल्हा काँगे्रस कमिटीच्या वतीने सायकल फेरीचे आयोजन करण्यात आले होते. कॅम्पातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ््यास शहराध्यक्ष रमेश बागवे, अ‍ॅड. अभय छाजेड व सुधीर जानजोत यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून सायकल फेरीला सुरुवात करण्यात आली.
सायकल फेरी डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ््यापासून सुरू झाली व काँगे्रस भवन येथे समाप्त झाली. ‘झाडे लावा झाडे जगवा,’ ‘जल है तो कल है,’ प्रदूषण टाळा सायकल चालवा, पाणी अडवा पाणी जिरवा अशा घोषणा या वेळी देण्यात आल्या.

Web Title: Organizing plantation, distribution of seedlings, public awareness rally

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.