सीएसआर सोशल फाउंडेशनच्या वतीने विविध उपक्रमांचे आयोजन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 21, 2021 04:23 AM2021-02-21T04:23:22+5:302021-02-21T04:23:22+5:30
रक्तदान शिबिराचे उद्घाटन डॉ. विजय हिरामण सातव यांच्या हस्ते करण्यात आले. रक्तदान शिबिरामध्ये ५५ रक्तदात्यांनी सहभाग घेवून रक्तदान केले. ...
रक्तदान शिबिराचे उद्घाटन डॉ. विजय हिरामण सातव यांच्या हस्ते करण्यात आले. रक्तदान शिबिरामध्ये ५५ रक्तदात्यांनी सहभाग घेवून रक्तदान केले.
ऑनलाइन वक्तृत्व स्पर्धेमध्ये ३०० हून अधिक जणांनी सहभाग घेतला होता त्याच्या बक्षीस वितरण समारंभ मुळशी तालुक्यातील सर्वपक्षीय नेते यांच्या हस्ते करण्यात आला.
आयोजित वक्तृत्व स्पर्धेचे विजेते पुढीलप्रमाणे शिशु गट- सूसचा धीरज झीरपे,
पिरंगुटची ओवी मारणे, लवळेचा श्रेयश प्रकाश राऊत विजेते ठरले.
तर बाल गटामध्ये मोशीची तृप्ती अशोक थिटमे, पिरंगुटची स्वराली अमित कोरे, हिंजवडीची श्रावणी देवकर विजेते ठरले.
युवक गटामध्ये रोहन अशोक थिटमे, साक्षी संपत कुदळे, साक्षी रवींद्र सातव विजेते ठरले.
खुला गटामध्ये अंजली केदारी, वैभवी काळभोर, ऋतुजा चव्हाण विजेते ठरले.
बक्षीस वितरण प्रसंगी नवनिर्वाचीत ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच आणि सदस्य यांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता.
तसेच यावेळी पौडचे पोलीस निरीक्षक अशोक धुमाळ यांचा सन्मान उद्योजक नाथाजी राऊत यांच्या हस्ते करण्यात आला.
यावेळी महादेव कोंढरे, सविता दगडे, सुनिल चांदेरे, आत्माराम कलाटे, शंकर मांडेकर, शांताराम इंगवले, रविंद्र कंधारे, विजय केदारी, प्रकाश भेगडे, स्वाती ढमाले, भानुदास पानसरे, गंगाराम मातेरे, दादाराम भांडेकर, सुहास भोते, दगडू करंजावणे, शिवाजी तांगडे निलेशभाऊ गावडे, सुखदेव तापकीर, शरद केदारी, सुनिल कळमकर आणि लवळे ग्रामपंचायतीचे सर्व विद्यमान सदस्य उपस्थित होते.