जनता विद्या मंदिर कनिष्ठ महाविद्यालयात विविध स्पर्धांचे आयोजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 6, 2021 04:18 AM2021-02-06T04:18:33+5:302021-02-06T04:18:33+5:30

मराठी भाषा ही एक समृद्ध आणि प्राचीन भाषा असल्याने तिचा जास्तीत जास्त वापर वाढावा, भाषेची गोडी वाढावी, असे ...

Organizing various competitions in Janata Vidya Mandir Junior College | जनता विद्या मंदिर कनिष्ठ महाविद्यालयात विविध स्पर्धांचे आयोजन

जनता विद्या मंदिर कनिष्ठ महाविद्यालयात विविध स्पर्धांचे आयोजन

Next

मराठी भाषा ही एक समृद्ध आणि प्राचीन भाषा असल्याने तिचा जास्तीत जास्त वापर वाढावा, भाषेची गोडी वाढावी, असे मत आंबेगाव तालुका विद्या विकास मंडळाचे अध्यक्ष अजित काळे यांनी अध्यक्षीय भाषणात व्यक्त केले. मराठी भाषा ही दैनंदिन व्यवहारात वापरली गेली पाहिजे, असे मत सचिव ॲड. मुकूंद काळे यांनी व्यक्त केले तर मातृभाषा ज्ञानभाषा झाली तर शिक्षण सुलभ होऊन आकलन क्षमता वाढीस चालना मिळू शकते, असे प्राध्यापक शीतल पवार यांनी सांगितले. यावेळी अरुण आवटे, माजी प्राचार्य सोपानराव मंडलिक, प्राचार्या एम. डी. खेडकर, उपप्राचार्य पी. आर. भिटे, जितेंद्र वामन, एस. एस. काळे उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक शीतल पवार यांनी केले तर सूत्रसंचालन सिद्धेश दरेकर आणि निकिता डोके या विद्यार्थ्यांनी केले.

Web Title: Organizing various competitions in Janata Vidya Mandir Junior College

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.